(फोटो सौजन्य: X)
सोशल मीडियावर अनेक गोष्टी शेअर केल्या जातात ज्यातील दृश्य अनेकदा आपल्याला थक्क करून जातात. इथे अनेक दुर्दैवी घटनाही शेअर केल्या जातात. त्यातच आता अशीच एक हृदयद्रावक घटना सध्या इंटरनेटवर शेअर करण्यात आली आहे जिने सर्वत्र धुमाकूळ उडवून दिला आहे. वास्तविक, या घटनेत एका ६ वर्षांच्या चिमुकल्याला एका ट्रकने चिरडल्याची घटना घडून आली आहे. यावेळी त्याची आई त्याच्यासोबतच होती आणि ते दोघेही दुचाकीवर बसून शाळेत जात होते मात्र शाळेत पोहचण्यापूर्वीच मुलासोबत ही दुर्दैवी घटना घडली. याचे लाइव्ह फुटेज आता सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
गुरुवारी सकाळी, तेलंगणातील डुंडीगल येथे ही घटना घडून आली. सकाळी ८ वाजता घडलेल्या या दुःखद घटनेत शाळेत जाणाऱ्या ६ वर्षांच्या मुलाचा वेदनादायक मृत्यू झाला. गीतांजली शाळेत शिकणारा अभिमांशू रेड्डी त्याच्या आईसोबत स्कूटीवर शाळेत जात होता. दरम्यान, जवळून जाणाऱ्या ट्रकला धडकल्याने स्कूटी घसरली आणि आई आणि मुलगा खाली पडले. आई कशीबशी वाचली पण मुलगा ट्रकखाली चिरडला गेला ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. व्हिडिओ व्हायरल होताच यावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे काहीजण आईची चूक असल्याचे म्हणत आहेत तर काहींना ट्रक ड्रायव्हरची चूक असल्याचे वाटत आहे.
Heart breaking incident, six-year-old boy (studying 1st class ) was killed after a tipper ran over him in Dudigal of Hyderabad. death on the spot … He was was on his way to school with his mother on a scooter, as part of their daily routin… and this incident happened pic.twitter.com/Ox32AGbuLg
— Dr Srinubabu Gedela (@DrSrinubabu) June 27, 2025
ही घटना झाल्यांनतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. अपघातानंतर चिमुकल्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. दुंडिगल पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या घटनेचा व्हिडिओ @DrSrinubabu नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्युज मिळाल्या असून अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जर या महिला ड्रायव्हिंग टेस्ट दिली तर मला किमान ९८% खात्री आहे की ती पास होणार नाही. आम्ही प्रत्येक ड्रायव्हिंग टेस्ट सरकारी वेबसाइटवर टाकण्याची मागणी केली होती पण सतरंगी मोदींनी ती मान्य केली नाही. त्याला पैसे हवे आहेत, आता भोगा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आईची चूक स्पष्ट दिसत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.