अरबी समुद्रात बुडालेल्या कृष्ण नगरीचा पाणबुड्यांनी घेतला शोध, भव्य राजवाडा अन् अद्भुत दृश्य पाहून डोळे दीपतील; Video Viral
सोशल मीडियावर अनेक अनोखे व्हिडिओ शेअर केले जातात. इथे अनके असे व्हिडिओ शेअर केले जातात जे आपल्या कल्पनेपलीकडचे असतात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओतील दृश्ये इतकी अद्भुत आहेत की ती पाहून तुमचे डोळे यांवरून हटणारच नाही. वास्तविक, हजारो वर्षांपासून, समुद्राखाली विलीन झालेल्या कृष्णगरीचे काही सुंदर दृश्य यात दाखवण्यात आले आहे. हे दृश्य इतके अद्भुत आहे की लोक ते पाहून सुखावून गेली आहेत आणि वेगाने हा व्हिडिओ शेअर करू लागली आहेत.
100 एकर मक्याच्या शेतात हरवलेल्या चिमुकल्याचा थर्मल कॅमेराने घेण्यात आला शोध; Video Viral
लाटांच्या खाली एक रहस्य लपलेले आहे जे पौराणिक कथा आणि भक्तीच्या कथांनी आजवर अमर राहिले आहे. हे भगवान श्रीकृष्णाने स्थापन केलेले शहर आहे, जे द्वारकेत बुडाले होते. पुराणांमध्ये असे म्हटले आहे की श्रीकृष्णाने मथुरा सोडले आणि समुद्रकिनाऱ्यावर एक अद्भुत शहर स्थापन केले, ज्याला द्वारका म्हटले जाते. हे शहर सोने, चांदी आणि मौल्यवान रत्नांनी सजवलेले होते; त्याच्या राजवाड्यांच्या भिंतींवर मोरपंखांचे आकृतिबंध होते आणि विशाल मंदिरांना आकाशाला भिडणारी छत होती.
महाभारत युद्धानंतर, जेव्हा श्रीकृष्णाने आपले मानव शरीर सोडले, तेव्हा हे शहर समुद्रात बुडाल्याचे सांगितले जाते. शतकानुशतके हे रहस्य एक आख्यायिका मानले जात होते, परंतु आधुनिक काळात सागरी शास्त्रज्ञ आणि पुरातत्वशास्त्रज्ञांनी गुजरातच्या किनाऱ्याजवळ प्राचीन पाण्याखालील रचना शोधल्या आहेत, ज्यामुळे या आख्यायिकेला सत्याशी जोडता येते.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केला असून व्हिडिओमध्ये कृष्णा नगरी दाखवली आहे, जी अजूनही समुद्राच्या खोलवर श्वास घेत असल्याचे दिसते. मोरपंखांच्या कोरीवकामासह सोनेरी रंगाचे खांब, शंख, चक्र आणि कमळाच्या नक्षी असलेली विशाल मंदिरे आणि समुद्राच्या खोलवर स्थित भगवान श्रीकृष्णाची एक विशाल मूर्ती. हे सर्व दाखवते की हे काही सामान्य शहर नव्हते, ते देवत्वाचे प्रतीक होते. ही कथा केवळ धार्मिक श्रद्धा नाही तर आपल्या सांस्कृतिक वारशाचे आणि कुतूहलाचे उदाहरण आहे. आज, एआय कलेच्या माध्यमातून, आपण त्या हरवलेल्या शहराची कल्पना करू शकतो, जे एकेकाळी जीवंत होते.
व्हिडिओ @jayprints नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, “द्वारकेची पुनर्कल्पना: कृष्णाचे बुडालेले राज्य” असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला 1 मिलियनहुन अधिकचे व्युज मिळाले असून अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे बनावट आहे पण सुंदर आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला माहित आहे की ते Ai ने जनरेट केले आहे पण माझे मन ते खरे आहे यावर विश्वास ठेवू इच्छिते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.