
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाने केले ट्रॅफिक जाम
व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल
प्रसिद्ध मधू वाघाचा बछडा असल्याचा अंदाज
सध्या सोशल मिडियावर रोज आपण अनेक व्हिडिओ पाहत असतो. सोशल मिडियावर रोज अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. हल्ली पुणे जिल्ह्यात आणि अनू काही जिल्ह्यात बिबट्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचे काही व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत. दरम्यान आता एका वाघाचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्याने संपूर्ण रस्ता अडवला आहे.
एका वाघाने रस्त्याच्या मध्येच ठाण मांडले असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याने दोन्ही बाजूने सुरू असणारे ट्रॅफिक अडवले आहे. हा व्हिडिओ चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. चंद्रपूर- मोहर्ली रस्त्याचा हा व्हिडिओ आहे. हा परिसर ताडोबा व्याघ्र प्रकल्प ,म्हणून संरक्षित आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठे प्रमाणात व्हायरल झाला आहे.
महाराष्ट्र के चंद्रपुर में बाघ ने रोकी सड़क!
ताडोबा के मोहर्ली मार्ग पर बाघ के बैठते ही घंटों रुकी आवाजाही #Tadoba #Chandrapur #TigerSighting #WildlifeAlert #MaharashtraNews #ViralVideo#Maharashtra #Viralvideos pic.twitter.com/VyOLtFQ63y — Chandani Sahu (@Chandanijk) November 28, 2025
रस्त्याच्या मधोमध बसलेला हा वाघ मधू वाघाचा बछडा असल्याचे म्हटले जात आहे. एका युवकाने हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. वाघ मध्ये बसल्याने दोनहूई बाजूची वाहतूक ठप्प झालेली दिसून येत आहे. नागरिक आपल्या वाहनांमध्ये सुरक्षितपणे बसून आहेत. वाघ आपल्या दिशेने जावा म्हणउण सगळे वाट बघत आहेत. कोणीही गडबड किंवा अन्य प्रकारे रस्ता ओलांडताना दिसून आले नाही.
ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात असल्याने येथील बराचसा भाग हा संरक्षित आहे. चंद्रपूर जिल्हा वाघांचा जिल्हा म्हणउण ओळखला जातो. त्यामुळे या ठिकाणी परिसरात अनेकदा वाघांचे दर्शन झाल्याचे दिसून येते.
पेंशन घ्यायच्या वयात आजोबांना बॉडी बनवायचं टेंशन!
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक आजोबा जीममध्ये गेले आहेत आणि दोन जड डम्बल उचलून एका फ्लॅट बेंचवर झोपले. यावेळी त्यांचा बॅलेंस काहीसा बिघडल्याचं देखील पाहायला मिळत आहे. आजोबांचा बॅलेंस बिघडल्याचं पाहून जिममधील एक व्यक्ती त्यांच्या मदतीसाठी येत असतो.
मात्र त्यापूर्वीच आजोबा स्वत:ला सावरतात आणि व्यायामाला सुरुवात करतात. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आजोबा बेंचवर झोपून डम्बल प्रेसची एक्सरसाइज करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ AI द्वारे तयार करण्यात आला आहे की हा खरंच एखाद्या जीममधील व्हिडीओ आहे, हे सांगणं कठीण आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.