आराराsss खतरनाक! गावकऱ्यांनी लढवली अनोखी शक्कल... संपूर्ण झाडावरच बसवले पंखे, दृश्य पाहून तुम्हीही व्हाल अवाक्; Video Viral
उन्हाळा ऋतू सुरु झाला आहे आणि यासोबतच गरम उन्हाच्या झळा आता लोकांना हैराण करत आहेत. उन्हळ्यात प्रत्येकजण थंड हवेच्या शोधात असतं ज्यासाठी काही लोक आपल्या घरी नवीन एसी आणतात तर कोणी आपल्या घरी कुलर आणत, तर काही लोक यासाठी वेगवेगळे घरगुती जुगाड ट्राय करतात. आताही उन्हाळ्याचा असाच एक जुगाड सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. मुख्य म्हणजे हा जुगाड काही साधा सुधा जुगाड नसून यात संपूर्ण गावानेच आपल्या बुद्धीचा विचार केल्याचे दिसून आले. व्हिडिओतील दृश्ये फारच अनोखी असून तुम्ही क्वचितच इतका खतरनाक जुगाड कुठे पाहिला असावा. नक्की यात काय घडले ते जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
तुम्ही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांसाठी पंखे लावलेले पाहिले असतील. मात्र संपूर्ण झाडावर कधी पंखे लावलेले तुम्ही पाहिले आहे का? अलिकडेच, सोशल मीडियावर याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका गावात एका मोठ्या झाडाखाली लोकांची गर्दी ताजी हवा घेण्यासाठी उभी असल्याचे दिसून आले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ते लोक झाडाची हवा खायला आले नसून झाडाखाली पंख्याची हवा लुटताना दिसून आले. व्हिडिओमध्ये झाडावर अनेक पंखे लटकवल्याचे दिसून आले, जे वेगाने सुरु देखील होते. गावकऱ्यांचा हा अनोखा जुगाड सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक आता यातील दृश्ये पाहून अचंबित झाले आहेत. तर काहींना या पंख्यांमध्ये वीज कधी आली असेल असा प्रश्न पडला आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @marathi_jokes_center नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्यूज तर हजारो लाइक्स मिळाले आहेत. तसेच व्हिडिओच्या कमेंट्समध्ये लोकांनी या जुगाडावर आपले मत देखील व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “काय गरज. समुद्रामध्ये शॉवर लावल्यासारखं झालं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “झाडांना फॅन लावण्यापेक्षा झाडे लावा जास्त आणि त्यांची काळजी घेतली तर अशी वेळच येणार नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.