(फोटो सौजन्य – Instagram)
अलीकडेच एक सुंदर आणि अलौकिक असे दृश्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. यात माता वैष्णो देवीच्या त्रिकुट पर्वतावर वीज पडल्याचे दृश्य दिसून आले. ही वीज रात्रीच्या सुमारास पडल्याने सर्वत्र फक्त विजेचा प्रकाश दिसू लागला. डोंगरामागून येणारा विजेचा प्रकाश अनेकांना थक्क करणारा ठरणारा आणि लोकांनी हे दृश्य लगेचच आपल्या कॅमेरात कैद केले. व्हिडिओतील हे दृश्य कोणत्या चित्रपटातील सीनहुन कमी वाटत नाही. चला नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडले व्हिडिओत?
गुरुवारी जम्मू आणि काश्मीरमधील कटरा येथे संध्याकाळची वेळ होती, तेव्हा हवामान अचानक बदलले आणि आकाशात काळे ढग जमा झाले. माता वैष्णो देवीचे दर्शन घेण्यासाठी त्रिकुट पर्वतावर पोहोचलेले भाविक त्यांच्या प्रवासाचा व्हिडिओ बनवत होते. मग अचानक ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि डोंगरावर एक जोरदार वीज चमकू लागली. हे दृश्य इतके अद्भुत होते की ज्याने ते पाहिले तो थक्क झाला. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी हे दृश्य आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले. त्यानंतर हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही त्रिकुट पर्वतावर पडणाऱ्या विजेचा प्रखर प्रकाश पाहू शकता, हे असे दृश्य आजवर लोकांनी फक्त चित्रपटांमध्येच पाहिले आहे, ज्यामुळे प्रत्यक्षात असे घडताना पाहून लोकांचे डोळे दिपले. सोशल मीडियावर आता हे दृश्य चांगलेच व्हायरल होत असून लोक या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र शेअर करत आहेत.
हा व्हिडिओ @jammulinksnews नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘कटरा येथील त्रिकुटा पर्वतावर वीज कोसळली’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले असून व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड करत आहे. व्हिडिओच्या कमेंट्समध्ये अनेकांनी या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जय माता दि. जय भवानी” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “असे म्हटले जाते की जेव्हा जेव्हा युद्ध होते तेव्हा माता राणी सर्वात पुढे उभी राहते आणि हे त्याचे संकेत आहे. जय माता दी”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.