(फोटो सौजन्य – X)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी लोक आपले स्टंट्स शेअर करतात तर कधी जुगाड तर कधी हे व्हिडिओ आपल्याला धक्का देणारेही ठरतात. आताही इथे एक असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्यांनी सर्वच हादरवून गेले. ‘अतिशहाणपणा त्याचा बैल रिकामा’ ही म्हण तर तुम्ही अनेकदा ऐकली असेल. याचीच प्रचिती देणारा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यातील थरारक दृश्ये तुमचा थरकाप उडवल्याशिवाय राहणार नाहीत.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक तरुण पाण्यात मगरीसोबत लढताना दिसून आला. हे दृश्य फारच थरारक असून ज्याने ते पाहिले त्याच्या अंगावर काटा आला. यात एक क्षण असाही आला ज्यात मगर व्यक्तीला आपल्या तोंडाने पाण्यात ओढते. हे सर्वच दृश्य पाहून आता हा माणूस जिवंत वाचतो की नाही याचीही शाश्वती राहत नाही मात्र सुदैवाने यात त्याचा जीव वाचतो. व्यक्तीला यात गंभीर दुखापत होते ज्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले जाते.
व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार, ही घटना फिलिपिन्समध्ये घडून आली आहे, जिथे एक मुलगा सेल्फी काढण्यासाठी पाण्यात उडी घेतो. खरंतर, व्यक्तीला ही मगर खरी नसून पुतळा असल्याचे वाटते मात्र पाण्यात जाताच त्याचा हा गैरसमज दूर होतो आणि त्याला या सेल्फीची मोठी किंमत मोजावी लागते. मगरीच्या हल्ल्यामुळे व्यक्तीचे शरीर रक्ताने माखले होते. त्याच्या हातावर आणि मांडीवर खोल जखमा होत्या. पार्क कर्मचाऱ्यांनी ताबडतोब त्याला मलमपट्टी केली आणि जवळच्या रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला ५० हून अधिक टाके देऊन त्याचे प्राण वाचवले. त्याचा पाय मोडला नसला तरी दुखापत गंभीर होती.
A tourist in the Philippines was mauled by a crocodile after mistaking it for a statue.
The 29-year-old climbed into the enclosure to take selfies before being attacked.
He suffered serious injuries but survived.#Philippines #CrocodileAttack pic.twitter.com/wQs6VSyh3v
— BPI News (@BPIOrgNews) April 29, 2025
खोडसाळपणा तर पाहा! नागिणीला पाहताच बिहारच्या मुलांनी फोनवर वाजवली बिन, मग पुढे जे घडलं… Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @BPIOrgNews या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून लोकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेविषयीचे आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “ज्या कुंपणात भयानक मगर असते तिथे कोण उडी मारतो? त्याला ते खोटे वाटले तो मूर्ख आहे का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याच्या मूर्खपणाबद्दल आपल्याला वाईट का वाटायला हवे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.