Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Udaipur Incident : ७० मीटर उंचावर झिप लाईनवर अडकले पर्यटक, ८ मिनिटे हवेत अडकून प्राण कंठाशी; Video Viral

Udaipur Video : उदयपूरच्या पर्यटनस्थळी घडली मोठी दुर्घटना. वातावरणात बिघाड होत असतानाही झिप लाईनवरील एक्टीव्हिटीज सुरुच ठेवण्यात आल्या. परिणामी ८ मिनिटे पर्यटकांचा जीव हवेतच टांगणीला लागला. या दृष्यांचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आलाय.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 18, 2026 | 01:59 PM
Udaipur Incident : ७० मीटर उंचावर झिप लाईनवर अडकले पर्यटक, ८ मिनिटे हवेत अडकून प्राण कंठाशी; Video Viral

Udaipur Incident : ७० मीटर उंचावर झिप लाईनवर अडकले पर्यटक, ८ मिनिटे हवेत अडकून प्राण कंठाशी; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • अचानक बदललेल्या हवामानामुळे साहसी उपक्रमादरम्यान पर्यटक अडचणीत सापडले.
  • काही काळ हवेतच अडकून राहिल्याने घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले.
  • बचाव पथकाने तातडीने कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
सोशल मिडियावर राजस्थानच्या उदयपूरमध्ये घडलेल्या एका अपघाताचे दृष्य शेअर करण्यात आले आहेत. एका एक्टिव्हीटी दरम्यान मोठी दुर्घटना झाली आणि पर्यटक मृत्यूच्या दारात जाऊन अडकले. हवामानातील अचानक बदल आणि मुसळधार पावसामुळे, काही पर्यटक ७० मीटर उंच झिप लाइनवर अडकून राहिले. मुख्य म्हणजे बचावासाठीचा हा थरार ८ मिनिटे सुरु राहिला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून यातील दृष्यांनी सर्वांच्याच अंगावर काटा आणला आहे. चला घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊया.

पाण्याने कासावीस झालेल्या गाैमातेची तहान तिने ओळखली, चिमुकलीने असं काही केलं की संपूर्ण इंटरनेट तिच्यावर फिदा झालं; Video Viral

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही उदयपूरच्या दूध तलाई पर्यटनस्थळी घडून आली. इथे ६३० मीटर लांब आणि ७० मीटर उंचीवर झिप लाईन कार्यरत आहे आणि इथेच हा अपघात घडला. दूध तलाई या पर्यटनास्थळावर दररोज पर्यटकांची मोठी गर्दी असते. इथे जाऊन साहसी खेळ खेळले जातात. बुधवारी १७ जून २०२६ रोजी वातावरणात अचानक बिघाड झाल्याने मुसळधार पाऊस पडू लागला. परंतु वातावरण खराब होत असतानाही झिप लाईन ऑपरेशन सुरु ठेवण्यात आले. या दरम्यानच काही पर्यटक झिप लाइनवर असताना, जोरदार वाऱ्याच्या दाबामुळे ते मध्येच अडकले आणि पुढे जाऊ शकले नाहीत. या घटनेचा व्हिडिओ घटनास्थळी उपस्थित असलेल्या एकाने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला. व्हिडिओमध्ये पर्यटक घाबरत झिप लाईनवर उभे असल्याचे दिसते.

माहितीनुसार, सोसाट्याच्या वाऱ्यात झिप लाईनवर अडकलेले दोन पर्यटक साधारण ८ मिनिटांपर्यंत हवेतच लटकत होते. यावेळी मदतीसाठी त्यांनी आरडाओरड देखील केली. दरम्यान खाली उभ्या असलेल्या लोकांसाठी हे दृष्य पाहणे भितीदायक ठरले. मुख्य म्हणजे या घटनेट कोणताही जिवीतहानी झाली नाही. सूचना मिळाल्यानंतर रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी झिप लाईनवर अडकलेल्या सर्व पर्यटकांना सुरक्षित खाली उतरवले. उदरपूरमधील या घटनेचा व्हिडिओ आता वेगवेगळ्या सोशल मिडिया प्लॅटफाॅर्म्सवर शेअर केला जात आहे.

अद्भूत! समुद्रात उभारले जाणार ८०,००० लोकांचे शहर, १ मैल लांबीच्या Freedom Shipची जगभर चर्चा; Video Viral

घटनेचा व्हिडिओ @viral_ka_tadka नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘उदयपूर घटना: ७० फूट उंचीवरून लटकलेले लोक’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “हे खूपच भयानक आहे, काही क्षणांसाठी जीव टांगणीला लागला असेल”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “देवाचे आभार, सर्व पर्यटक सुरक्षित आहेत” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “पावसाळ्यात अशा एक्टिव्हिटी तात्पुरत्या बंद ठेवायला हव्यात”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Udaipur zipline incident tourists stuck midair due to rain and strong winds viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
1

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
2

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
3

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
4

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.