(फोटो सौजन्य: X)
असं म्हणतात की, मदत हा माणवाचा सर्वात मोठा धर्म मानला जातो. आपण केलेली मदत ही कधी व्यर्थ जात नाही तर आपल्यावर परिस्थिती आली की कोणत्या ना कोणत्या रुपात त्याची परतफेड होतेच. सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक चिमुकली गायीला पाणी पाजताना दिसून आली. उन्हामुळे गाय पाण्यासाठी आसुसली आहे हे तिने ओळखले आणि लगेच गायीला पाणी पाजण्यासाठी ती पुढे आली.
मुलीच्या पाठीवर बॅग होती ज्यावरुन ती क्लासवरुन घरी परतत असल्याचे समजते. अशात वाटेतच तिला तहानलेली गाय दिसते आणि ती गायीला मदत करण्याचा निर्णय घेते. रस्त्यात असलेल्या हँडपंपच्या हँडलला मुलगी हलवते ज्यानंतर हँडपंपमधून पाण्याच्या धारा वाहू लागतात. पाणी पाहताच गाय जवळ येते आणि हँडपंपमधून निघणारे पाणी पिऊन ती आपली तहान भागवते. दरम्यान चिमुकलीचा हा व्हिडिओ व्हायरल होताच तिच्या या परोपकारावर लोक चांगलेच खुश झाले आहेत. हिंदू धर्मात गायीला गाैमातेचे महत्त्व असल्याने तिला पाणी पाजून पुण्याचं काम केलं अशा प्रतिक्रिया व्हिडिओला दिल्या जात आहेत.
In the intense heat wave this baby girl is
doing a great job. 👏 pic.twitter.com/QMc8XqwuQq — Shaurya Mishra (@shauryabjym) June 17, 2026
हा व्हिडिओ @postabcs नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘या तीव्र उष्णतेच्या लाटेत ही चिमुकली खूप छान काम करत आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “खूप सुंदर, सुसंस्कृत आणि सुशिक्षित मुलगी”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जय गाैमाता” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “या स्वार्थी जगात मुलीमध्ये परोपकाराची भावना आहे हे पाहून चांगलं वाटलं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






