
Unique Wedding: अजब लग्नाची गजब गोष्ट (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Unique Wedding Story News: लग्न म्हटलं की प्रत्येक जोडप्याची काही ना काही खास इच्छा असते. कुणाला वेगळ्या ठिकाणी विवाह करायचा असतो, तर कुणाला हटके थीम ठेवायची असते. पण केरळमध्ये झालेल्या एका विवाहसोहळ्याने या सगळ्यांपेक्षा वेगळी ओळख निर्माण केली आहे. कारण या लग्नात फक्त वधू-वरच नव्हते जुळे, तर संपूर्ण सोहळ्यात जुळ्या व्यक्तींचाच अनोखा सहभाग पाहायला मिळाला. त्यामुळे हा विवाह सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
या आगळ्यावेगळ्या सोहळ्यात दोन जुळ्या भावांनी दोन जुळ्या बहिणींशी विवाह केला. एवढंच नाही, तर लग्नातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही जुळ्या भावंडांनीच सांभाळल्या. त्यामुळे उपस्थित पाहुण्यांसाठी हा अनुभव खरोखरच खास ठरला. अनेकांनी अशा प्रकारचा विवाह पहिल्यांदाच पाहिल्याचे सांगितले.(Unique Wedding:)
ही घटना केरळमधील चंगनासेरी परिसरातील आहे. येथील एका कुटुंबातील अखिल आणि निखिल हे जुळे भाऊ विवाहबंधनात अडकले. त्यांच्यासाठी वधू म्हणून मॅगी आणि मारिया या जुळ्या बहिणींची निवड झाली. दोन्ही कुटुंबांची अनेक वर्षांची इच्छा होती की जुळ्या मुलांचे लग्न जुळ्याच मुलींशी व्हावे. अखेर योग्य वेळ आल्यावर हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले.
या विवाहाची खास गोष्ट म्हणजे संपूर्ण कार्यक्रमात एक वेगळाच योगायोग पाहायला मिळाला. विवाह लावणारे धर्मगुरूही जुळे भाऊ होते. त्यांच्यासोबत वेदीवरील धार्मिक विधींमध्ये मदत करणारे युवकही जुळेच होते. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण सोहळ्यात जुळ्या व्यक्तींचीच उपस्थिती होती. हा अनोखा योग पाहून अनेक पाहुणे आश्चर्यचकित झाले.
Viral Video: काजू कतली खरेदी करणं पडलं महाग! पुढे जे समोर आलं, ते पाहून ग्राहक हादरला
या सोहळ्यासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. वधूंनी आधीच जुळ्या धर्मगुरूंशी संपर्क साधून त्यांच्याकडूनच विवाह पार पाडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार सर्व नियोजन करण्यात आले आणि अखेर हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. उपस्थितांनी या संकल्पनेचे भरभरून कौतुक केले.
लग्नानंतर नववधूंनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, लहानपणापासूनच त्यांना जुळ्या भावांशी लग्न करण्याची इच्छा होती. इतकंच नव्हे, तर विवाहसोहळ्यातही जुळ्या व्यक्तींचा सहभाग असावा, असे त्यांचे स्वप्न होते. अनेक वर्षांनी त्यांची ही इच्छा पूर्ण झाल्याने त्या खूप आनंदी असल्याचे त्यांनी सांगितले.
Spoiler दिला अन् थिएटरमध्ये झाला ‘क्लायमॅक्स’! चित्रपटगृहात तुफान हाणामारी; Video Viral
विवाह लावणाऱ्या धर्मगुरूंनीही हा अनुभव त्यांच्या आयुष्यातील विशेष क्षण असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, एका नव्हे तर दोन जुळ्या जोडप्यांना एकाच वेळी विवाहबंधनात अडकताना पाहणे हा अत्यंत भावनिक आणि आनंददायी अनुभव होता. हा प्रसंग आयुष्यभर लक्षात राहील, असेही त्यांनी नमूद केले.