
फोटो सौजन्य सोशल मिडिया
केरळमध्ये घडलेल्या या भीषण अपघाताचा CCTV व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अपघाताची भीषणता आणि वाहनांचे झालेले नुकसान स्पष्टपणे दिसून येते.
व्हिडिओच्या सुरुवातीला मारुती सुझुकीच्या पांढऱ्या रंगाची ‘ब्रेझा’ कार तिच्या लेनमधून जात होती. अचानक कार चालकाचे लक्ष विचलित होऊन कार विरुद्ध दिशेने गेली, बाजुच्या लेन मधून येणाऱ्या वाळूने भरलेल्या ट्रकला धडक दिली. या अपघातात कार चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे किंवा लक्ष विचलित झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.
Keralam, Mavelikara 🚨⚠️ Disturbing Visuals 🚨 Breeza Driver seems distracted, rammed lorry…🤷♂️ Sand laden lorry rolled over, Hyundai i20 lucky escape, braked on time…maybe, issues with lorries front axle… @DriveSmart_IN @RSGuy_India https://t.co/pKoFrB3u2u — Dave (Road Safety: City & Highways) (@motordave2) November 1, 2026
ब्रेझा कारची भीषण धडक बसल्यानंतर, वेगात असलेली कार आणि वाळूने पूर्णपणे भरलेला तो मोठा ट्रक रस्त्यावरून घसरला आणि बाजूलाच असलेल्या एका दुकानाजवळ पलटी झाला. ट्रक पलटी झाल्यामुळे त्यामधील अनेक टन वाळू रस्त्याच्या आजूबाजूला पसरली. या संपूर्ण घटनेत रस्त्याच्या कडेला पार्क केलेली किंवा अगदी जवळ असलेली ‘ह्युंदाई आय२०’ कार सुदैवाने धडकेपासून पूर्णपणे वाचली आहे.
अपघातानंतर लगेचच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रक चालकाला आणि कारमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू केले गेले. हा व्हिडिओ हायवेवरील अतिवेग आणि क्षणभराचे दुर्लक्ष किती प्राणघातक ठरू शकते, याचे हे ताजे उदाहरण आहे.
Bengaluru News : भरदिवसा चालत्या दुचाकीवर तरुणाचा जीवघेणा स्टंट; व्हीलीचा व्हिडिओ व्हायरल
Ans: केरळमध्ये मारुती सुझुकी ब्रेझा कार आणि वाळूने भरलेल्या ट्रकमध्ये भीषण अपघात झाला.
Ans: कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार विरुद्ध दिशेला जाऊन ट्रकला धडकल्याचे CCTV व्हिडिओमध्ये दिसते.
Ans: वाळूने भरलेला ट्रक रस्त्याच्या बाजूला पलटी झाला.