ह्रदयद्रावक! कॅन्सरच्या असह्य वेदनेमुळे कापावा लागला हात, कापलेल्या हातांवर केले अंत्यसंस्कार; Photo हात
कर्करोग किंवा कॅन्सर हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे. हा एक भयंकर रोग असून आजकाल या रोगामुळे हे जागतिक स्तरावर मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण बनले आहे. कर्करोगाचा आजार कुणालाही कधीही होऊ शकतो यामुळे आपली तब्बेत हळूहळू खालावू लागते. मागेच टीव्ही ऐक्ट्रेस हिना खान हिलाही ब्रेस्ट कँसरने झाला ज्याला ती अजूनही झुंज देत आहे. तिच्याप्रमाणेच अमेरिकेतील 22 वर्षांशी इन्फ्ल्यूएंसर अल्दियारा डूसेट देखील कँसरला लढा देत आहे. आपल्या उपचारादरम्यानचे अनेक फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अल्दियारा डूसेटला दुर्मीळ कॅन्सर आहे, ज्यात तिला तिचा उजवा हात कापावा लागला. या कठीण काळातही तिने हार मानली नाही आणि या आजराशी ती संयमतेने ती लढत राहिली. नुकतेच तिने आपल्या सोशल मीडियावर हँडलवर आपल्या कापलेल्या उजव्या हाताच्या अंत्यसंस्काराचे फोटो शेअर केले. खरंतर तिचा हा आजार इतका वाढला की त्याला यात आपला उजवा हात गमवावा लागला. अल्दियारा शेअर केलेले हे फोटोज पाहून आता अनेकजण भावूक झाले आहेत. तसेच लोक आता तिच्या धैर्याचे कौतुक करत आहे.
अल्दियारा तीन वर्षांपासून आपल्या कँसरच्या आजराचा सामना करत होती. सुरुवातीला फार वेदना झाल्या. अशा स्थितीत एके दिवशी या असह्य वेदनांपासून आराम मिळावा म्हणून तिने आपला हात उकळत्या पाण्यात घातला. केमोथेरपी आणि रेडिएशन व्यतिरिक्त अनेक शस्त्रक्रिया करून देखिले अल्दियाराला तीन वर्षांच्या कालावधीत तीन वेळा कॅन्सरचा सामना लागला, यामुळे कॅन्सर आजारातून बरं झाल्यानंतरही आजार पुन्हा उफाळून येण्याची भीती कायम होती. ज्यामुळे अखेर तिला आपला उजवा हात कापण्याचा निर्णय घ्यावा लागला.
शस्त्रक्रियेपूर्वी, अल्दियाराने आपल्या हाताबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि तिच्या आयुष्यातील त्याचे महत्त्व जाहीर केले. यानंतर अंतिम निरोप म्हणून तिने आपल्या कापलेल्या हातांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. काळा पोषक परिधान करून अल्दियाराने एक भावनिक समारंभ आयोजित केला. यामध्ये तिने आपल्या कुटुंब आणि मित्रांसह तिच्या कापलेल्या हातावर अंत्यसंस्कार केले. व्हायरल फोटोजमध्ये तिचा हाथ राखाडी रंगाच्या आत ब्लॅंकेटमध्ये गुंडाळलेला दिसून येत आहे. या हातावर काळ्या रंगाची नेलपेंट लावली आहे तर मनगटावर लाल रंगाची गुलाबाची फुले लावलेली आहेत. हे फोटो आता आता सोशल मीडियावर इतके व्हायरल झाले आहेत की त्यांना 50 लाखाहून अधिक लोकांच्या व्युव्ज मिळाल्या आहेत. हे फोटो @semibionicbarbie नावाच्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.