Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाडीतून उतर… रॅपिडो ड्रायव्हरने महिलेला शिवीगाळ करत रस्त्याच्या मधोमध उतरवलं; रडतच तिने VIDEO केला शेअर

Viral Video : रात्री रॅपिडो कॅब बुक करणं पडलं महागात! गाणी कमी करायला सांगताच ड्रायव्हरला राग अनावर झाला त्याने शिवीगाळ करतच महिलेला कॅबमधून बाहेर उतरवलं. घटनेत पुढे काय घडलं ते तुम्हीच पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 26, 2025 | 10:49 AM
गाडीतून उतर... रॅपिडो ड्रायव्हरने महिलेला शिवीगाळ करत रस्त्याच्या मधोमध उतरवलं; रडतच तिने VIDEO केला शेअर

गाडीतून उतर... रॅपिडो ड्रायव्हरने महिलेला शिवीगाळ करत रस्त्याच्या मधोमध उतरवलं; रडतच तिने VIDEO केला शेअर

Follow Us
Close
Follow Us:
  • रात्री रॅपिडो कॅब बुक केल्यानंतर महिलेला ड्रायव्हरकडून गैरवर्तन आणि शिवीगाळ सहन करावी लागली.
  • गाण्याचा आवाज कमी करण्याची विनंती केल्यावर ड्रायव्हर संतापला आणि भररस्त्यात उतरायला सांगितले.
  • भीतीदायक परिस्थितीत ड्रायव्हरने अचानक गाडी पळवली; कशीबशी महिला गाडीतून बाहेर पडली.
आपला प्रवास सुखकर करण्यासाठी अनेकजण आजकाल ऑनलाईन कॅबचा पर्याय निवडतात. रात्रीच्या वेळी मोकळ्या रस्त्यावर रिक्षा किंवा कॅब शोधणे कठीण ठरु शकते अशावेळी ऑनलाईन बुक केलेली कॅब काहीवेळातच स्वत: आपल्याला घ्यायला येते ज्यामुळे अनेकजण प्रवासासाठी ऑनलाईन कॅब बुकिंगचा पर्याय निवडतात. अशातच आता यासंदर्भात एका महिलेने आपला अनुभव शेअर केला आहे, रात्रीच्या वेळी रॅपिडो कॅब बुक करताच तिला ड्रायव्हरसोबत एका वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले ज्याविषयी तिने व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. व्हिडिओमध्ये महिला रडत रडत आपली व्यथा सांगताना दिसली. चला तर मग नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

जपान है तो मुमकिन है! तंत्रज्ञानाचा चमत्कार, रस्ताच बनवला म्युझिकल… गाडी गेली की आपोआप वाजतं संगीत, Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये महिला आपला अनुभव शेअर करताना दिसते. ती सांगते की, रॅपिडो कॅब ड्रायव्हरने त्या महिलेला अतिशय वाईट वागणूक दिली. त्याने तिला गंतव्यस्थानापर्यंत पोहचवण्याआधीच भररस्त्यात गाडीतून बाहेर निघायला सांगितल आणि महिलेने जेव्हा असं करण्यास नकार दिला तेव्हा तो तिला शिवीगाळ करु लागला. रात्रीच्या अंधारात ऑफिसवरुन घरी परतताना महिलेसोबत हा प्रकार घडला.

महिलेच्या म्हणण्यानुसार, गाडीमध्ये फार मोठ्या आवाजात गाणे वाजत होते. तिने ड्रायव्हरला दोनदा आवाज कमी करण्यास सांगितले, पण त्याने ते ऐकले नाही. तिसऱ्यांदा जेव्हा तिने पुन्हा म्युझिक कमी करण्यास सांगितले, तेव्हा ड्रायव्हरला राग अनावर झाला. ड्रायव्हरने महिलेला अपशब्द वापरत सांगितले, “तुझ्या बापाची गाडी आहे का? फोनवर बोलायचे असेल तर उतर माझ्या गाडीतून आणि जाऊन आपल्या बापाच्या गाडीत बस.” महिलेने सांगितले की, जेव्हा तिने दुसरी कॅब येईपर्यंत तिला गाडीतच थांबण्याची विनंती केला तेव्हा ड्रायव्हरने ‘आता तू पाहा’ म्हणत अचानक गाडी पळवली. यानंतर कशीबशी गाडी थांबवत ती यातून बाहेर निघाली.

अबब! ऑनलाईन खरेदी पडली महागात, 5 ग्रॅमचं सोनं ऑर्डर केलं पण डिलिव्हर झालं 1 रुपयाचं नाणं; Video Viral

महिलेने आरोप केला आहे की, जेव्हा ती पोलिस ठाण्यत तक्रार दाखल करायला गेली तेव्हा पोलिसांनी तक्रार दाखल करण्याऐवजी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. तिने डिस्ट्रिक्ट कोर्टात ड्रायव्हर विरोधात केस दाखल केल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @stargirl_on_the_go नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेक युजर्सने कमेंट करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तुमच्या धाडसाला सलाम” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कधीही एकतर्फी कथेवर विश्वास ठेवू नये” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “माझ्यासोबतही असं घडलं होत पण मी त्यावेळी धाडस दाखवलं नाही कारण त्यावेळी माझ्यासोबत माझी मुले होती”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral rapido driver abused the woman and made her get out in the middle of the road viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 10:49 AM

Topics:  

  • shocking viral news
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

जपान है तो मुमकिन है! तंत्रज्ञानाचा चमत्कार, रस्ताच बनवला म्युझिकल… गाडी गेली की आपोआप वाजतं संगीत, Video Viral
1

जपान है तो मुमकिन है! तंत्रज्ञानाचा चमत्कार, रस्ताच बनवला म्युझिकल… गाडी गेली की आपोआप वाजतं संगीत, Video Viral

अबब! ऑनलाईन खरेदी पडली महागात, 5 ग्रॅमचं सोनं ऑर्डर केलं पण डिलिव्हर झालं 1 रुपयाचं नाणं; Video Viral
2

अबब! ऑनलाईन खरेदी पडली महागात, 5 ग्रॅमचं सोनं ऑर्डर केलं पण डिलिव्हर झालं 1 रुपयाचं नाणं; Video Viral

थोडक्यात अनर्थ टळला! बंद लिफ्टच्या खड्ड्यामध्ये चिमुकलीचा तोल जाणार इतक्यात…; वॉचमॅन बनला देवदूत, Video Viral
3

थोडक्यात अनर्थ टळला! बंद लिफ्टच्या खड्ड्यामध्ये चिमुकलीचा तोल जाणार इतक्यात…; वॉचमॅन बनला देवदूत, Video Viral

वाह रे मुंबई! रिक्षाच्या छतावर श्वान, खाली ट्रॅफिक… प्राण्याची अनोखी राईड पाहून युजर्स झाले खुश; Video Viral
4

वाह रे मुंबई! रिक्षाच्या छतावर श्वान, खाली ट्रॅफिक… प्राण्याची अनोखी राईड पाहून युजर्स झाले खुश; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.