(फोटो सौजन्य: instagram)
सासू आणि सुनेचं नातं खूप वेगळं असतं. तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये सासू सुनेतील शीतयुद्ध पाहिले असेल. यात बऱ्याचदा खाष्ट सासू आणि सोज्वळ सुनेचं चित्रण केलं जातं. मात्र प्रत्येकवेळी असं घडतंच असं नाही बऱ्याचदा याउलटही गोष्टी घडून येतात आणि याचेच जिवंत उदाहरण आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. सासू सुनेच्या नात्यात जितके खटके उडतात तितकेच प्रेम आणि आदरही असते मात्र बऱ्याचदा गोष्ट जेव्हा मर्यादेपलीकडे जाते तेव्हा आपला संयम हलतो आणि आपल्याकडून नको ते घडून बसते.
सध्या सोशल मीडियावर सासू सुनेच्या मारहाणीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पण यात सासू सुनेला नव्हे तर सुनच सासूचा छळ करताना दिसून आली आहे. या घटनेने अनेकांना आता हादरवून सोडले आहे. व्हिडिओत सून आपल्या सासूला असे झोडपते की पाहून कुणाच्याही अंगावर काटा येईल. आता यात नक्की काय आणि कसे घडले याविषयी चला सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तुम्हाला थक्क करून सोडेल. यात एक सून सासूचा छळ करताना दिसते. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक सून सासूचा निर्दयतेने छळ करत त्यांना मारहाण करत आहे. पायऱ्यावंर आपटत ती सासूला खाली पाडते.हातात धोपाटण घेऊन आधी ती सासूवर निशाणा साधते मग ते बाजूला करत आपल्या हातांनी सासूला पकडते आणि थेट पायऱ्यांवर आपटते. यानंतर सासू जमिनीवर पडून राहते आणि मग सून तिथून निघून जाते. व्हिडिओतील प्रकार असामान्य असून लोक आता यावर आपला संताप व्यक्त करत आहेत.
घटनेचा व्हिडिओ @vikram.verma.710667 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘कारवाई झाली पाहिजे, अशा महिलेलावर, लज्जास्पद’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “वरील देव सर्व पाहत आहे, तुमच्या बाबतीतही असेच होईल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आईशी असे करणाऱ्या सुनेला घरातून हाकलून दिले पाहिजे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.