(फोटो सौजन्य: X)
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, महिला कर्मचारी ऑफिसच्या ऑनलाईन टीम मिटिंगमध्ये सामील झाली होती. जिथे सर्वजण तयारी करून अगदी शिष्टाचाराने मिटिंगसाठी तयार होते तिथेच जेन झेड महिला कर्मचारी साधा टीशर्ट, चेहऱ्यावर फेस मास्क, डोक्यावर टॉवेल आणि हातात पाण्याची सिपर घेऊन मिटिंगमध्ये सहभागी झाली होती, तिचे हे रूप पाहून सर्वच सदस्यांना हसू अनावर झाले. बॉसची प्रतिक्रिया यात अधिक रंजक ठरते. रागावण्याऐवजी तिचा बॉस, उत्सुकता दाखवतो आणि फेस पॅकबद्दल तिला विचारतो. महिला गंमतीने स्पष्ट करते की तो कडुलिंबाचा फेस पॅक आहे आणि बॉसला तो वापरून पाहण्याचा सल्ला देते. नंतर बॉस यांनी स्वतः या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, ही एक गंमत होती जी त्यांच्या टीमकडून नकळतपणे रेकॉर्ड होऊन सोशल मीडियावर पोस्ट झाली. त्यांनी लिहिले की, या व्हिडिओला इंस्टाग्रामवर ७० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
GenZ Employees are Next Level- This Girl attended an online Office Meeting With Neem Face Mask on 😂🤦♀️😂 pic.twitter.com/85qyYzGnsa — Rosy (@rose_k01) March 16, 2026
हा व्हिडिओ @rose_k01 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “या Gen Z (जनरेशन Z) मुळेच आमचे ‘वर्क फ्रॉम होम’ रद्द होत आहे. कोविडपूर्व काळात, तुम्ही घरून काम करता की ऑफिसमधून, याची कोणालाच पर्वा नव्हती. आता मात्र प्रत्येकाला तुम्ही ऑफिसमध्येच असावे असे वाटते.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अशा गोष्टींना ‘नेक्स्ट लेव्हल’ म्हटले जाताना पाहून दुःख वाटते… उलट, हे तर व्यावसायिकतेचे सर्वात खालचे टोक आहे.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “’Gen Z’ केवळ घरातून कामच करत नाहीये… तर ते घरातूनच भरभराटीस येत आहेत. एका-एका ‘फेस पॅक’च्या मदतीने, ते कामाच्या ठिकाणचा ‘ड्रेस कोड’च नव्याने लिहित आहेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






