
गायीला चिकन मोमोज खायला घातल्याचा Video व्हायरल (Photo Credit - X)
*गाय को खिलाया चिकन मोमोज* गुरुग्राम में गाय को चिकन मोमोज खिलाने का वीडियो वायरल हो रहा है। वीडियो वायरल होते ही हिंदू संगठन के कार्यकर्ताओं ने आरोपी ऋतिक को पकड़कर उसकी पिटाई कर दी। कार्यकर्ताओं ने पुलिस में आरोपी के खिलाफ शिकायत भी दर्ज कराई है। धार्मिक भावनाएं आहत करने… pic.twitter.com/UwgNaeKmIk — Amarjeet Kumar (@Amarjeet0096) December 10, 2025
युट्यूबरने ‘व्ह्यूज’साठी केले कृत्य
गुरुग्राममधील न्यू कॉलनी परिसरात राहणाऱ्या ऋतिक नावाच्या तरुणाने हा वादग्रस्त व्हिडीओ बनवला. स्वतःला युट्यूबर म्हणून ओळख देणाऱ्या या तरुणाचा दावा आहे की, त्याने हा व्हिडीओ ऑनलाइन पैसे कमावण्यासाठी आणि सोशल मीडियावर त्याची लोकप्रियता (Followers) वाढवण्यासाठी बनवला होता. व्हायरल व्हिडीओमध्ये, ऋतिक गायीसमोर चिकन मोमोज ठेवून तिला खाण्यास उद्युक्त करताना दिसतो. त्यानंतर ती गाय मोमोज खाऊ लागते. फॉलोअर्स मिळवण्यासाठी काही लोक कोणत्याही थराला जातात आणि समाजात नकारात्मक संदेश पसरवतात, अशी टीका स्थानिकांनी केली आहे.
हिंदू संघटनांमध्ये संताप, पोलिसांकडून गुन्हा दाखल
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच हिंदू संघटना आणि गोरक्षक संतापले. त्यांनी या घटनेला धार्मिक श्रद्धा आणि परंपरांचा अनादर ठरवत तरुणाला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. संतापलेल्या गोरक्षकांनी तरुणाला पकडून मारहाण केल्याचेही वृत्त आहे. वाद वाढत असताना, सेक्टर-५६ पोलीस ठाण्यात तक्रारीवरून तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
आरोपीने मागितली माफी, केला धक्कादायक दावा
वाद वाढत असताना, आरोपी तरुण ऋतिकने आणखी एक व्हिडीओ जारी करून सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे. ऋतिकने कबूल केले की त्याने चूक केली असून गायीला चिकन मोमोज खायला घालणे ही त्याची चूक होती. त्याने असा धक्कादायक दावा केला की, “माझे ऑनलाइन ब्रेनवॉश केले गेले.” काही लोकांनी त्याला अशी सामग्री तयार करण्यास प्रवृत्त केले होते आणि त्यासाठी पैसेही पाठवले होते, असा खुलासाही त्याने केला. त्याने पुन्हा अशा कृत्यांमध्ये सहभागी होणार नाही, असे वचन दिले. तसेच, त्याची आई डॉक्टर आहे आणि वडील व्यापारी आहेत, अशी माहितीही त्याने दिली.