(फोटो सौजन्य – Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसून येते की, श्वानाचं एक पिल्लू दोन इमारतींमधील लहानश्या जागेत, अरुंद खड्ड्यात पडलं आहे. पिल्लाला खाली पडलेलं पाहून त्याची आई कासावीस होते आणि मोठमोठ्याने भुंकत मदतीसाठी हाक मारु लागते. शेवटी तिला असं भुंकताना पाहून काही युवक काहातरी घडलं आहे हे पाहण्यासाठी जवळ जातात आणि खड्यात तिचं पिल्लू पडलेलं पाहतात. यानंतर तरुण पिल्लाला वाचवण्यासाठी शोध मोहिम चालू करतात आणि तब्बल साडेतीन तासांच्या मेहनतीनंतर पिल्लाला सुखरुप खड्यातून बाहेर काढलं जातं. ते एका दोरीच्या साहाय्याने त्याला काळजीपूर्वक खड्यातून बाहेर काढतात. व्हिडिओच्या शेवटी पिल्लाला आईच्या स्वाधीन केल्याचे दिसते, ज्यानंतर ती त्याला प्रेमाने चाटू लागते. मानव जेव्हा आपल्या शक्तीचा वापर योग्यरित्या करतो तेव्हा दृश्य घडून येते आणि असेच दृश्य आताच्या व्हिडिओत दिसून आले. श्वानाला एकट्याने पिल्लाला बाहेर काढणं शक्य नव्हतं ज्यामुळे विश्वासाने तिने मानवाची मदत घेतली आणि तरुणांनी तिच्या या विश्वासाला सार्थकी लावलं.
घटनेचा व्हिडिओ @street_animals47 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भावांनो, मी तुम्हाला मनापासून सलाम करतो.. देव तुम्हाला आयुष्यभर सुरक्षित ठेवो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सध्याच्या जनरेशनला अशा लोकांची गरज आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “एका कुत्र्याला वाचवल्याने जग बदलणार नाही, पण त्या एका कुत्र्यासाठी जग कायमचे बदलेल हे निश्चित”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






