(फोटो सौजन्य – Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात, एक गाय खुंटीला बांधून ठेवल्याचे दिसून येते. तिच्याजवळचे तिचे वासरु गोठ्यात गिरक्या मारतं असतं आणि याचवेळी त्याची नजर तिथे ठेवलेल्या मक्याच्या कणसाच्या ढिगावर जाते. कणिस पाहून वासरु खुश होतो आणि लगेच त्यांच्यावर ताव मारायला सुरुवात करतो. पण काहीच क्षणात त्याला आपली आई देखील भुकेली आहे याची जाणीव होते. खुंटीला बांधून ठेवल्यामुळे गाय काय कणसापर्यंत पोहचू शकत नाही, ज्यामुळे वासरुच धावत पळत जाऊन त्यातील एक कणिस उचलतो आणि आपल्या आईच्या म्हणजेच गाईच्या तोंडाकडे हळुवारपणे घेऊन जातो. गाय देखील हे पाहून खूप खुश होते आणि कणिस तोंडात टाकून त्याची छान चव घेऊ लागते. शेवटी तेही आईचं लेकरुचं आहे… प्राण्यांकडे शब्द नसले तरी भावना निश्चितच आहेत याची प्रचिती या व्हिडिओतून घेतली जाऊ शकते.
गाय आणि वासराचा हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून याला आतापर्यंत 4.6 मिलियनहून अधिकचे व्यूज मिळाले आहेत. हा व्हायरल व्हिडिओ @thehappivibe नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेक युजर्सने कमेंट्स करत या गोड दृश्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “प्राण्यांकडे माणसांहून अधिक माणुसकी आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला माझ्या आईची आठवण येत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “किती सुंदर व्हिडिओ आहे हा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






