
धावत्या रेल्वेत पूजा सुरू असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाला आणि त्यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांना हा प्रकार सामान्य प्रवासी डब्यात घडला असावा, असे वाटले. त्यामुळे रेल्वेमध्ये अशा प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाते का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. व्हायरल व्हिडियोमध्ये पुजेमध्ये असणारे लोकांनी पांढरे रंगाचे कपडे परिधान केले आहेत. हा व्हिडिओ काही वेळातच चर्चेचा विषय ठरला. अनेकांनी रेल्वे प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी यामागील खरी माहिती जाणून घेण्याची मागणी केली.
या प्रकरणावर अखेर रेल्वे प्रशासनाने स्पष्टीकरण दिले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा कार्यक्रम सर्वसामान्य प्रवाशांसाठी असलेल्या डब्यात नव्हता. तो खासगी वापरासाठी आरक्षित करण्यात आलेल्या विशेष रेल्वे डब्यात आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे इतर प्रवाशांना कोणताही त्रास झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. रेल्वेने सांगितले की, संबंधित डबा आधीच नियमांनुसार खासगी बुकिंगद्वारे आरक्षित करण्यात आला होता. हा डबा सामान्य कोचपेक्षा वेगळा असून त्यामध्ये राहण्याची, जेवणाची आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध असतात. त्यामुळे त्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम पार पडला.
बाप रे! ट्रेनमध्ये लेडी पॉकेटमारचा थरार; डोळ्याची पापणी लवते न लवते तोच …
या खास डब्यासाठी संबंधित व्यक्तींनी मोठी रक्कम भरून अधिकृत परवानगी घेतली होती. नियोजित प्रवासादरम्यान हा डबा रेल्वेला जोडण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिकृत प्रक्रियेनुसारच झाला, असे रेल्वेने स्पष्ट केले. व्हिडिओ पाहून अनेकांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र रेल्वे प्रशासनाने अशा कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झाला नसल्याचे सांगितले. प्रवासादरम्यान सर्व सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते. तसेच रेल्वेच्या नियमित सेवेमध्ये कोणताही अडथळा निर्माण झाला नाही.
Fact Check : पत्नीने पतीला मारत मृतदेह गॅस सिलेंडरमध्ये लपवला? Viral …
अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. व्हिडिओमध्ये दिसणारे पुजारी हे त्या खासगी कार्यक्रमाचा भाग होते. हा धार्मिक विधी पूर्णपणे आरक्षित डब्यातच झाला असल्यामुळे इतर प्रवाशांशी त्याचा कोणताही संबंध नव्हता. रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले की, प्रवाशांची सुरक्षितता, वेळेवर सेवा आणि नियमांचे पालन हीच त्यांची सर्वोच्च जबाबदारी आहे. कोणत्याही परिस्थितीत या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यामागील सत्य जाणून घेणे आवश्यक असल्याचेही या घटनेतून स्पष्ट झाले.
Hello @AshwiniVaishnaw, was this approved by @RailMinIndia? If so, What is the procedure? pic.twitter.com/9VUJP53lJQ — Mohammed Zubair (@zoo_bear) July 12, 2026
या घटनेनंतर सोशल मीडियावर चर्चेचा जोर वाढला असला, तरी रेल्वेच्या स्पष्टीकरणामुळे अनेक गैरसमज दूर झाले आहेत. व्हिडिओ पाहून निर्माण झालेला संभ्रम आता कमी झाला असून, हा कार्यक्रम नियमांनुसार खासगी बुकिंग केलेल्या डब्यातच पार पडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांसाठी असलेल्या रेल्वे सेवेमध्ये कोणताही बदल किंवा विशेष सवलत देण्यात आली नव्हती, असे रेल्वेने ठामपणे सांगितले.