
cjp protest viral video
CJP Protest : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत जोरदार आंदोलन पार पडले. कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थी संघटनांच्या तर्फे काल पार पडलेल्या या आंदोलनाची देशभर चर्चा सुरु आहे. CJP चे संस्थापक अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तसेच विरोधी पक्षातील नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ निर्माण झाली होती. अश्यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून यात ‘हिंदू रक्षा दल’ चे काही कार्यकर्ते आंदोलक विद्यार्थिनींना मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, दिल्ली पोलिसांच्या उपस्थितीत ते गुंड विद्यार्थिनींना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत असून पोलीस व्यवस्था आणि महिला सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
समाजमाध्यमांवर व्यक्त होत असलेल्या प्रचंड रोषानंतर आता व्हिडिओत दिसणाऱ्या हिंदू रक्षा दलाच्या गुंडाना पोलिसांनी अटक केले असल्याची माहिती मिळत आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीसुद्धा हा व्हिडीओ ट्विट करत केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर निशाणा साधला. त्यानंतर हे प्रकरण ज्वलंत होत असता दिल्ली पोलिसांना त्या गुंडाना अटक करण्याची उपरती झाली.
डीडीयू मार्गावरील कमला मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही जण तरुण विद्यार्थ्यांना मारहाण करताना आणि महिलांशी धक्काबुक्की करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, ही घटना घडत असताना घटनास्थळी एक पोलीस कर्मचारीही उपस्थित असल्याचं फुटेजमध्ये दिसत आहे.
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावं रमण सैनी (50), विवेकानंद ऊर्फ विवेक (32), कपिल कुमार (27) आणि रविंदर सिंग ऊर्फ गोविंद हिंदू (35) अशी आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
या घटनेबाबत कोणतीही अधिकृत तक्रार पोलिसांकडे दाखल झाली नव्हती. मात्र, सोशल मीडियावर व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली. संबंधित व्यक्ती दिल्ली-एनसीआर परिसर सोडून जाण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाल्यानंतर तपासाला वेग देण्यात आला.
सुरुवातीला व्हिडिओ नेमका कुठे चित्रित झाला, हे स्पष्ट नव्हतं. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तपास करून घटनास्थळ शोधून काढलं आणि संबंधित चार जणांना अटक केली.
अमित शाह की दिल्ली पुलिस खुद तो गुंडागर्दी पर उतर ही आई – RSS-BJP के असली गुंडों को भी महिलाओं और युवाओं पर हिंसा करने की खुली छूट और बढ़ावा दे रही है। जैसा मैंने कहा था, Mogambo Modi और उसकी सरकार जितना दबाएगी, Gen Z और छात्रों का गुस्सा उतना ही बढ़ेगा। सोमवार, 12 अक्टूबर को कांग्रेस, पूरा INDIA गठबंधन और देश के युवा बड़ी संख्या में एक बार फिर सड़कों पर उतरेंगे। और इस बार भी आवाज़ पूरे देश में गूंजेगी – पहले से कहीं ज़्यादा। @AmitShah, जितनी पुलिस लानी है, 10 हज़ार, 20 हज़ार, 40 हज़ार, ले आइए। BJP-RSS के जितने गुंडे बुलाने हैं, बुला लीजिए। हम डरने वाले नहीं हैं। पीछे हटने वाले नहीं हैं। ये लड़ाई अब रुकने वाली नहीं है! सोमवार को हम मुख्य न्यायाधीश से भी मिलेंगे और मांग करेंगे कि जब दिल्ली की सड़कों पर संविधान को तार-तार किया जा रहा है और लोकतंत्र को कुचला जा रहा है, तब कानून के संरक्षक आंखों पर पट्टी डाल कर नहीं बैठ सकते। संविधान की धज्जियां उड़ेंगी और हम चुप बैठेंगे? ऐसा हरगिज़ नहीं होगा। जवाबदेही तय करवाकर रहेंगे! — Rahul Gandhi (@RahulGandhi) October 10, 2026
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावृत्ती (SIR) प्रक्रियेविरोधात दिल्लीमध्ये आंदोलन सुरू होतं. 10 ऑक्टोबर रोजी शहरातील विविध भागांत निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
या आंदोलनादरम्यान घडलेल्या मारहाणीच्या घटनेमुळे आता सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे लक्ष लागलं आहे.