
लाज सोडली...! बादली घेतली, साबण लावला अन् व्यक्तीने चक्क ट्रेनमध्ये केली आंघोळ, मग रेल्वेने अशी ॲक्शन घेतली की... Video Viral
आजच्या काळात सोशल मिडिया हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. इथे दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. हे एक असे प्लॅटफाॅर्म आहे, जिथे कधी काय घडेल आणि दिसून येईल ते सांगता येत नाही. नुकताच एक विचित्र आणि सर्वांना आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती रेल्वेमध्ये सर्वांसमोर उघडा होऊन आंघोळ करताना दिसून आला. व्यक्तीच्या या कृत्याने सर्वच हादरले आणि लोकांना हे दृश्य आपल्या कॅमेरात कैद केले. मग काय या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे प्रशासनाने यावर कडक कारवाई केली आणि व्यक्तीला जन्माची अद्दल घडवली. चला नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
इंटरनेटवर वाऱ्यासारखा हा व्हिडिओ पसरला आहे ज्यात एक व्यक्ती ट्रेनमध्ये आंघोळ करताना दिसून आला. व्हिडिओमध्ये ट्रेनच्या सीटवर काही लोक बसलेले दिसून येतात. काही वेळाने मात्र कॅमेरा ॲंगल दुसऱ्या दिशेला फिरतो ज्यानंतर जे दिसते ते सर्वांनाच हादरवून सोडते. ट्रेनच्या दरवाज्यासमोर एक माणूस समोर बादली घेऊन उभा असतो. तो पाण्याच्या ग्लासाने आपल्या अंगावर पाणी ओततो. तो इथेच थांबत नाही तर आपल्या केसांना शॅम्पू लावत आरामात आपली आंघोळ आटोपतो, शेवटी पाण्याची पूर्ण बादलीच आपल्या अंगावर ओतून त्याची आंघोळ अखेर पार पडते पण ते दृश्य इतरांना अचंबित करते. रेल्वेतील प्रवासी हा सर्व प्रकार पाहून थक्क झाल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसून येतो.
वीरांगना लक्ष्मीबाई झांसी स्टेशन पर ट्रेन में नहाने का वीडियो बनाने वाले व्यक्ति की पहचान कर ली गई है। इस व्यक्ति द्वारा रील बनाकर लोकप्रियता हासिल करने के लिये ऐसा कार्य करने की बात स्वीकार की गयी है। आरपीएफ द्वारा उपरोक्त व्यक्ति के विरुध्द विधिक कार्यवाही की जा रही है।
उत्तर… https://t.co/eZ9akMmqOF — North Central Railway (@CPRONCR) November 9, 2025
घोर कलियुग! समोर चिता जळत होती अन् ‘ती’ डिजेच्या तालावर…, धक्कादायक Video Viral
घटनेचा व्हिडिओ @CPRONCR नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच सेंट्रल रेल्वेने व्हिडिओवर ट्विट करत या घटनेवर कायदेशीर कारवाई केली जात आहे, असे स्पष्ट केले. यामध्ये रेल्वेकडून असे लिहिण्यात आले की, “वीरांगना लक्ष्मीबाई झाशी स्टेशनवर ट्रेनमध्ये आंघोळ करण्याचा व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. या व्यक्तीने रील बनवून लोकप्रियता मिळविण्यासाठी हे केल्याचे कबूल केले आहे. वरील व्यक्तीविरुद्ध RPF कडून कायदेशीर कारवाई केली जात आहे. नॉर्थ सेंट्रल रेल्वे सर्व प्रवाशांना विनंती करते की त्यांनी असे काहीही करू नये जे इतर प्रवाशांसाठी अनुचित आणि गैरसोयीचे असेल.”
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.