
WWE रिंगमध्ये धोबीपछाड करताना दिसली अभिनेत्री प्रीती झिंटा; काठीने मारलं, लाथा-बुक्क्यांनी केला प्रहार...धक्कादायक Video Viral
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा आता जवळजवळ पन्नास वर्षांची झालेली आहे पण तिच्या सौंदर्याने ती अजूनही लाखो फॅन्सच्या मनावर राज्य करते. 19’s चा काळ गाजवणारी ही अभिनेत्री सध्या पंजाब किंग्स या आयपीएल संघाची को-ओनर आहे. चित्रपटसृष्टीपासून लांब झालेली ही अभिनेत्री आयपीएलमध्ये मात्र आवर्जून दिसून येते. दरम्यान प्रीती झिंटाचा एक अनोखा आणि सर्वांना आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ सध्या सोशल मेडियावर धुमाकूळ माजवत आहे. व्हिडिओमध्ये ती WWE रिंगमध्ये एका महिलेला धोबी-पछाड करताना दिसली. प्रीतीचा हा अनोखा अंदाज आणि धक्का देऊन जाणारा हा व्हिडिओ काही क्षणातच युजर्ससाठी लक्षणीय ठरला. व्हिडिओत नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत चालेल्या या व्हिडिओमध्ये WWE च्या लढाईसाठी स्टेज सज्ज झाल्याचे दिसते. हजारो प्रेक्षक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. कॅमेरा आता रिंगमध्ये एका महिला कुस्तीगीरवर लक्ष केंद्रित करतो, जी अगदी प्रीती झिंटासारखी दिसते. ती प्रहार करण्यासाठी पूर्णपणे तयार असते. दरम्यान, रिंगच्या बाहेर, विरोधी कुस्तीगीर उभी असते. प्रीती झिंटा रिंगमधून बाहेर येत विरोधी कुस्तीगीर महिलेला पायाने लाथ मारून जमिनीवर पाडते आणि मग एका काठीने तिच्यावर हल्ला करू लागते. युजर्स हे दृश्ये पाहून थबकले आहेत पण खरंतर व्हिडिओत दिसणारी ही महिला प्रीती झिंटा नसून तिच्यासारखी दिसणारी एक आयर्लंडची प्रोफेशनल कुस्तीगीर आणि WWE स्टार लायरा वलकरिया आहे. प्रीती झिंटाच्या नावाने व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ खरंतर तिचा नसून कुस्तीगीर लायरा वलकरिया हिचा आहे. यामुळे व्हिडिओत करण्यात आलेला दावा खोटा असल्याचे स्पष्ट होते.
“Preity Zinta debuted in WWE” ✅ pic.twitter.com/SVG9g1p9Xm — Qasim Husain 🇮🇳 (@qasim_says_) October 2, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @qasim_says_ नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे कसं झालं?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही आलू पराठ्याची पॉवर आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “काय मूर्खपणाच्या अफवा पसरवल्या जात आहेत? लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी काहीही करत आहात”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.