स्टंटबाजी पडली महागात! एस्कलेटवरुन सायकल चालवायला गेला अन्...; असं काही घडलं की पुन्हा करणार नाही धाडस, Video Viral (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
Stunt Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. जुगाड (Jugaad), स्टंट (Stunt), भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. स्टंटचे तर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. कोणी बाईकवर उभे राहून स्टंट करते, तर कोणी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा, छतावर चढण्याचा स्टंट करते. यामुळे अनेक वेळा लोकांना गंभीर दुखापत झाली आहे, अनेकांचा जीव गेला आहे. पण लोक सुधरण्याचे नाव घेत नाही. लोक स्वत:ला इतके शहाणे समजतात की असे धोकादायक स्टंट ते रोजच करत असतात, हे त्यांच्यासाठी सामान्यच आहे.
सध्या सोशल मीडियावर असाच एक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणाला स्टंटबाजी चांगलीत महागात पडली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक तरुणी इलेक्ट्रिक एस्कलेटवर सायकल घेऊन गेला आहे. त्यावरुन सायकल चावलवण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याच्यासोबत जे घडलं ते भयानक आहे. तरुणाला जन्माची अद्दल घडली असणार आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुण एस्कलेटवरुन धडाम असा आदळला आहे. नंतर काय झाले याची माहिती मिळालेली नाही, परंतु नक्कीच तरुणाला गंभीर दुखापत झाली असणार आहे.
स्टंटबाजी, हिरोगिरीचे वाढते प्रमाण
गेल्या काही काळात स्टंटबाजीचे, हिरोगिरीचे प्रमाणात अतिशय वाढले आहे. यामध्ये लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचा समावेश आहे. स्वत:ला हिरो दाखवण्यासाठी, सोशल मीडियावरील लाईक्स आणि व्ह्यूजसाठी लोक जीव धोक्यात घालत आहे. यामध्ये मुलींचाही समावेश आहे. यामुळे हे लोक आपला आणि आपल्या आसपासच्या लोकांचाही जीव धोक्यात घालतात.
स्वच्छता कर्मचारीसमोर तरुणाचं ‘ते’ अश्लील कृत्य; संतापून महिलेनं झाडूनं धु, धु, धुतलं, Video Viral
व्हायरल व्हिडिओ
pic.twitter.com/3rEMDcuY46 — Wild CCTV (@wildcctv) November 14, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @wildcctv या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. काही लोकांनी असे एस्कलेटवरुन सायकल घेऊन कोण उतरते असा प्रश्न केला आहे, तर काहींनी अशा लोकांविरोधात कडक कारवाई केली पाहिजे असे म्हटले आहे. तर काही लोकांनी अलीकडच्या लोकांना स्वत:ला हिरो समजण्याचे वेडं लागले आहे. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
पप्पा, पप्पा…! वरातीत लहानग्यासारखे ढसाढसा रडू लागला नवरदेव; कारण काय तर भावाने…, पाहा मजेशीर VIDEO
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






