Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

परंपरेनुसार नवी मुंबईत परदेशी पाहुण्यांचे आगमन! करावे गावातील खाडीत हजारो गुलाबी फ्लेमिंगोचे दर्शन; Video Viral

Pink Flamingo Video : हजारो फ्लेमिंगो आणि सीगल पक्ष्यांचे नवी मुंबईच्या खाडीत आगमन झाले आहे. गुलाबी वातावरणाने सजलेले हे दृश्य पाहण्यासाठी आता पर्यटक सज्ज झाले असून याचा एक सुंदर व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 09, 2025 | 10:27 AM
परंपरेनुसार नवी मुंबईत परदेशी पाहुण्यांचे आगमन! करावे गावातील खाडीत हजारो गुलाबी फ्लेमिंगोचे दर्शन; Video Viral

परंपरेनुसार नवी मुंबईत परदेशी पाहुण्यांचे आगमन! करावे गावातील खाडीत हजारो गुलाबी फ्लेमिंगोचे दर्शन; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • पिंक फ्लेमिंगो आणि सीगल पक्ष्यांचे नवी मुंबईत आगमन
  • सुंदर दृश्यांनी परिसर सजला
  • व्हिडिओ इंटरनेटवर होतोय व्हायरल
दरवर्षीच्या परंपरेनुसार, नवी मुंबईच्या खाडीत मोठ्या संख्येत स्थलांतरित फ्लेमिंगोचे आगमन झाले आहे. ANI ने शेअर केलेल्या अलिकडच्या व्हिडिओमध्ये, करावे गावातील अरबी समुद्राच्या एका इनलेटमध्ये हजारो फ्लेमिंगो आणि सीगल कैद झाले आहेत. दरवर्षी हिवाळ्यात, स्थलांतरित पक्षी नवी मुंबईच्या किनाऱ्यावर गुलाबी रंग भरतात. नोव्हेंबरपासून सुरू होणारी, वसंत ऋतू-उन्हाळ्याच्या महिन्यांपर्यंत त्यांचा विसावा या ठिकाणी असतो. याकाळात त्यांचे अनेक सुंदर दृश्य सोशल मिडियावर शेअर केले जातात. आताही असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे ज्यात गुलाबी फ्लेमिंगोने खाडी अद्भूत दृश्यांनी बहरलेली दिसून आली.

कान्हाच्या प्रेमात भान हरपून बसली! वरात आली, कन्यादानही झालं अन् विधिवत युपीच्या कन्येने केलं श्रीकृष्णाशी लग्न; Video Viral

हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी अनेक पक्षी निरीक्षक या भागात येतात आणि फ्लेमिंगो आणि सीगलचे हे दृश्य आपल्या कॅमेरात कैद करतात. हे पक्षी बहुतेक गुजरातमधील कच्छ आणि राजस्थानमधील सांभर तलावातून येतात. त्यापैकी काही पक्षी मध्य पूर्व, इराक आणि अगदी आफ्रिकेतून प्रवास करतात असे मानले जाते. पक्ष्यांचे हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी नवी मुंबईतील अनेक पर्यटक त्यांच्या गुलाबी रंगाचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने जमतात. ते सहसा नोव्हेंबर महिन्यात येतात परंतु यावर्षी उष्ण हवामानामुळे त्यांच्या वार्षिक भेटीला उशीर झाल्याचे दिसून येते.

#WATCH | Maharashtra: A large number of migratory flamingos, seagulls and other birds have arrived at the creek in Karave village in Navi Mumbai pic.twitter.com/9IAR9algzg — ANI (@ANI) January 8, 2025
Flamingos,Navi Mumbai,Flamingo season,Wildlife India,Bird migration,Pink wetlands,Nature photography,Allycaral,Mumbai wetlands,Urban wildlife,Pratik543,India nature sights pic.twitter.com/D08omSIaUn — Allycaral (@allycaralgoa) December 8, 2025

Viral Video: “याला म्हणतात खरी जिद्द…”, दोन्ही हात नाही तरी चालवली बाईक, गाडी चालवण्याची पद्धत पाहून व्हाल अवाक्

एएनआयने एक्स वर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, हजारो गुलाबी फ्लेमिंगो पक्षी एकत्र जमल्याचे दिसून येते. हे अद्भूत दृश्य तुम्हाला इतर सीजनमध्ये नाही तर फक्त हिवाळ्यातच पाहता येऊ शकते. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘नवी मुंबईतील करावे गावातील खाडीत मोठ्या संख्येने स्थलांतरित फ्लेमिंगो, सीगल आणि इतर पक्षी आले आहेत’. नवी मुंबईत स्थलांतरित पक्ष्यांना पाहण्यासाठी शिवडी मॅन्ग्रोव्ह पार्क, नेरुळमधील तवले वेटलँड्स, भांडुप पंपिंग स्टेशन, माहुल क्रीक आणि टीएस चाणक्य बर्डिंग पॉइंट लोकप्रिय आहेत.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral arrival of pink flamingos and seagulls in navi mumbai viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 10:27 AM

Topics:  

  • birds
  • Navi Mumbai
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: लग्नासाठी भारतात आलेल्या स्वीडिश तरुणाचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू!
1

Navi Mumbai Crime: लग्नासाठी भारतात आलेल्या स्वीडिश तरुणाचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू!

कान्हाच्या प्रेमात भान हरपून बसली! वरात आली, कन्यादानही झालं अन् विधिवत युपीच्या कन्येने केलं श्रीकृष्णाशी लग्न; Video Viral
2

कान्हाच्या प्रेमात भान हरपून बसली! वरात आली, कन्यादानही झालं अन् विधिवत युपीच्या कन्येने केलं श्रीकृष्णाशी लग्न; Video Viral

नवी मुंबईसाठी आणखी एक मेट्रो! पहिल्यांदाच विमानतळासह शहराच्या अंतर्गत भागांना जोडणारी एक नवीन मार्गिका
3

नवी मुंबईसाठी आणखी एक मेट्रो! पहिल्यांदाच विमानतळासह शहराच्या अंतर्गत भागांना जोडणारी एक नवीन मार्गिका

Viral Video: “याला म्हणतात खरी जिद्द…”, दोन्ही हात नाही तरी चालवली बाईक, गाडी चालवण्याची पद्धत पाहून व्हाल अवाक्
4

Viral Video: “याला म्हणतात खरी जिद्द…”, दोन्ही हात नाही तरी चालवली बाईक, गाडी चालवण्याची पद्धत पाहून व्हाल अवाक्

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.