(फोटो सौजन्य – Instagram)
काय आहे प्रकरण?
यूपीची राहणारी पिंकी आधीपासूनच भगवान श्रीकृष्णाची भक्त होती. ती तिच्या पालकांसह अनेकदा वृंदावनला जात असे. पिकिंने श्रीकृष्णाच्या मूर्तीसोबत लग्न करण्याचे प्रमुख कारण म्हणजे तिचा बांके बिहार मंदिरात दिसलेला चमत्कार. वास्तविक घडलं असं की, पिंकीने बांके बिहारी मंदिरला भेट दिली तेव्हा तिला तिच्या ओढणीत सोन्याची एक अंगठी आढळली. पिंकीने हे भगवान कृष्णाचे संकेत मानले आणि कोणत्याही मानवाशी नव्हे तर भगवान कृष्णाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाने पालक आधा गोंधळले पण नंतर त्यांनीही मुलीची श्रद्धा पाहून तिच्या या लग्नाला होकार दिला.
काही काळापूर्वीचे पिंकी आजाराशी झुंज देत होती. याकाळात तिने श्रीकृष्णाची जड मूर्ती मांडीवर घेत वृंदावन आणि नंतर गोवर्धन पर्वताची प्रदक्षिणा घातली. त्यानंतर तिच्या तब्येतीत चमत्कारिक सुधारणा दिसून आली. या अनुभवामुळे तिचा विश्वास आणखी दृढ झाला की फक्त कृष्णच तिच्या आयुष्याचा भाग बनू शकेल. अगदी विधिवत तिचे हे लग्न लोकांच्या साक्षेत पार पडलं. लग्नानंतर पिंकी कुठेही गेली नाही तर तिच्या घरीच राहणार असून कुटुंबाने आनंदाने तिचा हा निर्णय स्वीकारला आहे. या अनोख्या विवाहाचा व्हिडिओ आता इंटरनेटवर वेगाने व्हायरल आणि शेअर केला जात आहे. याचा व्हिडिओ इंटरनेटवर @informedofficial नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त केले. एका यूजरने लिहिले की, “ती तिची इच्छा आहे. भारतात काहीही होऊ शकते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, “समाजात एवढी अस्थिरता कुठून येत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






