
हरणाची मान चोचीत पकडली अन् हवेतच गरुडाने केली थरारक शिकार, दृश्य असे की पाहून सर्वच हादरले; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, गरुडाने हरणाची शिकार केल्याचे दिसून येते. व्हिडिओमध्ये, हे स्पष्टपणे दिसून येते गरुडाने हरणाला आपल्या चोचीत पकडून त्याला हवेतूनच कुठेतरी घेऊन जात असतो. हरणाचे शरीर हवेत उडत असते आणि गरुड पंख पसरुन त्याला घेऊन जात असतो. यावेळी हरीण कोणतीही हालचाल करत नसल्याने तो कदाचित जिवंत नसल्याचे समजते. काही सेकंदांचा हा व्हिडिओ जंगलाचे नियम आणि शिकारी पक्ष्यांची शक्ती स्पष्टपणे दर्शवितो. काही सेकंदांचा हा व्हिडिओ जंगलातील शिकाऱ्यांची ताकद आणि निसर्गाचं क्रूर वास्तव याचे दर्शन घडवून देते. व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून हवेतून होत असलेल्या या शिकारीच्या दृश्यांनी सर्वांनाच थक्क करुन सोडलं आहे.
Eagle carrying an entire adult deer pic.twitter.com/YxCWkdyLSG — Invisidon (@QuantumAlteredX) January 20, 2024
घटनेचा व्हिडिओ @QuantumAlteredX नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आशा आहे की हा गरुड कधीही प्राथमिक शाळेत लहानशा नाश्त्यासाठी येणार नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सोनेरी गरुड डोंगरावरून त्यांची शिकार करतात. ते शिंगे पकडण्यासाठी झपाट्याने धावतात आणि नंतर सहज मारण्यासाठी हरण/बकरी कड्यावरून फेकून देतात. ते पर्वत त्यांच्या मालकीचे आहेत!” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “गरुड १४० पौंड वजनाचे हरण वाहून नेऊ शकतो हे अविश्वसनीय वाटते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.