
धाकड छोरी! रस्त्यावर मुलीची छेड काढत होता व्यक्ती, तिने बांबू घेतला अन्... घटनेचा Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओत केलेल्या दाव्यानुसार, सदर घटना उत्तर प्रदेशमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या रस्त्यांवर एका मुलीचा विनयभंग केला जात होता ज्याच्या उत्तरात तिने गप्प न बसता व्यक्तीला त्याची चुकीची अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला. व्हिडिओमध्ये मुलगी अक्षरश: हातात बांबू घेऊन रस्त्यात व्यक्तीची धुलाई करताना दिसून येते. व्यक्ती तिला रोखण्याचा आतोनात प्रयत्न करतो पण मुलगी इतकी संतापलेली असते की ती त्याला सटासट बांबूचे वार करु लागते. ही घटना हिंसाचाराचे नव्हे तर स्वसंरक्षणाचे आणि धैर्याचे उदाहरण देते.जेव्हा मुलाने मुलीवर लैंगिक अत्याचार केला तेव्हा घाबरण्याऐवजी मुलीने धाडसाने स्वतःचा बचाव केला पाहिजे. संधी साधून तिने मुलाला पकडले आणि पुन्हा असे कृत्य करू नये म्हणून काठीने मारहाण केली पाहिजे.
लखनऊ में मनचले को मिला तुरंत जवाब 🚨 एक लड़का लड़की से छेड़छाड़ कर रहा था..
लड़की ने डरने की बजाय… खुद का बचाव करते हुए विरोध किया..
यह हिंसा नहीं,आत्मरक्षा और हिम्मत की मिसाल है 👉 सवाल यही है…
क्या अब भी चुप रहना ही सही माना जाएगा.. pic.twitter.com/tNVS4uTUV7 — KUNDAN PATEL (@KUNDAN00PATEL) January 28, 2026
घटनेचा व्हायरल व्हिडिओ @KUNDAN00PATEL नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जी मुलगी घाबरली नाही, जिने प्रतिकार केला, ती केवळ स्वतःलाच वाचवत नव्हती; तर अनेक वर्षांपासून गप्प राहण्यास सांगितलेल्या प्रत्येक मुलीचा ती आवाज बनत होती.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही अनेक मुलींसाठी तातडीने कृती करण्याची प्रेरणा आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हिने तर मर्दानी चित्रपटाचा सीन सत्यात करुन दाखवला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.