(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
या व्हायरल व्हिडिओमध्ये, तुम्ही एक मुलगी पाहू शकता जी दारूच्या नशेत असल्याचे दिसते. ती इतकी दारूच्या नशेत दिसते की ती डगमगते आणि स्वतःच्या पायावर उभी राहण्यासही सक्षम नसते. तिचा प्रियकर तिला तिच्या घरी घेऊन जातो. शेवटी, जेव्हा ती स्वतःला सावरू शकत नाही, तेव्हा तो तिला आपल्या हातात घेतो. तो दार उघडून आत जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा समोरचे दृश्य पाहून तो थक्क होतो. समोर मुलीचे वडिल उभे असतात. संतप्त नजरेने पाहत असणाऱ्या वडिलांना पाहून तो घाबरतो आणि क्षणाचाही विलंब न करता मुलीला बेडरुममध्ये नेतो. मुलगा काही सेकंदातच मुलीला बेडरुममध्ये पोहचवून कुणालाही काही न बोलता तिथून आपला पळ काढतो. दरम्यान यूजर्स आता या दृश्यांची चांगलीच मजा लुटत असून या व्हिडिओला सोशल मिडियावर वेगाने शेअर करत आहेत.
Girl drunk so high that she couldn’t even stand up properly. Look at the pain in her father’s eyes.💔💔 Feminism taught girls that this is empowering. I won’t say anything, it’s her choice.✅✅🙏🏻 pic.twitter.com/uyVzGc3vxq — Wife With Extra Marital Affairs 😘😘 (@MenTooHuman) January 20, 2026
दरम्यान हा व्हिडिओ @MenTooHuman नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भावा, पुढे काय झालं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भावा तू तर चांगलाच फसला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “स्क्रिप्टेड आहे हे…”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






