
लव्ह-जिहाद मुद्दा पुन्हा ऐरणीवर! सोयाबीन आहे सांगत मुस्लिम बॉयफ्रेंडने ब्राह्मण गर्लफ्रेंडला खाऊ घातलं चिकन, पाहून युजर्स भडकले
काय आहे प्रकरण?
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि दावा व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा आरोप केला जात आहे की एका मुस्लिम तरुणाने त्याच्या ब्राह्मण मैत्रिणीला न सांगता सोयाबीनऐवजी चिकन खाऊ घातलं. ती मुलगी म्हणते की ती ब्राह्मण आहे आणि तिच्या धार्मिक श्रद्धेनुसार तिने आधीच स्पष्ट केले होते की ती मांसाहारी अन्न खात नाही. खाण्याच्या निवडी बहुतेकदा वैयक्तिक श्रद्धा आणि संगोपनाशी जोडल्या जातात, म्हणूनच स्पष्टता आणि मोकळेपणा महत्त्वाचा असतो. बरेच प्रेक्षक यावर भर देत आहेत की, कोणत्याही नात्याला, विशेषतः भिन्न सांस्कृतिक किंवा धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या नात्याला प्रामाणिक संवाद आणि सीमांचा आदर आवश्यक आहे. मुलीच्या धर्माचा आदर न करता मुलाने तिला नकळत चिकन खाऊ घातलं ज्यावर युजर्स आता चांगलेच भडकले असून इंटरनेटवर व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे.
हा व्हिडिओ @missmalinitrending नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “म्हणूनच आपण नेहमी चांगल्या मित्रांसोबत असले पाहिजे, अशा लोकांसोबत नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “वय फक्त एक आकडा आहे भाऊ, प्रेरित राहा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तिने असा बॉयफ्रेंड बनवलाच का? म्हणजे, ज्या बॉयफ्रेंडला त्याच्या गर्लफ्रेंडच्या धार्मिक श्रद्धेची पर्वा नाही, त्याची मानसिकता कशी असेल?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.