
पाकिस्तानच्या नेत्यांना लाज नाही! पैसे एकाचे पण हात 12 जणांचे, संसदेत घडला हास्यास्पद प्रकार... पाहून सभापतीही हादरले
काय घडलं व्हिडिओत?
वास्तविक घडलं असं की, संसदेच्या कामकाजादरम्यान जमिनीवर काही नोटा पडल्या होत्या. या नोटा कुणाच्या पडल्या हे ठाऊक नसल्याने सभापतींनी या नोटा उचलून या नोटा कुणाच्या आहेत याची विचारणा केली. नोटा एकाच्या पडल्या पण या नोटा मिळवण्यासाठी एक-दोन नव्हे तर १२ खासदारांनी आपले हात वर केले. हे पाहून सभापती सभापती अयाज सादिक देखील हादरले. प्रत्येकाने नोटा त्यांच्या मालकीच्या असल्याचा दावा करायला सुरुवात केली. त्यांनी विनोदाने म्हटले, “पैशांपेक्षा दावेदार जास्त आहेत. संपूर्ण सभागृहाने हात वर केले आहेत.” संसदेत उपस्थित असलेले सर्व सदस्य या परिस्थितीवर हसायला लागले. पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थितीचा फटका नेत्यांनाही पडल्याचे यातून स्पष्ट होते म्हणून तर एकाच्या पैशांसाठी सर्व नेत्यांची तुंबळ संसदेत दिसून आली.
कामकाजाच्या शेवटी, सभापतींनी घोषणा केली की चौकशीनंतर खऱ्या मालकाची ओळख पटली आहे. हे पैसे पीटीआय नेते इक्बाल आफ्रिदी यांचे होते. त्यांनी चुकून नोटा टाकल्या आणि त्यांना परत करण्यात आल्या. तथापि, ज्या पद्धतीने १२ खासदार एकाच वेळी पैशाचा दावा करण्यासाठी आले ते पाकिस्तानच्या संसदेच्या इतिहासातील एक हास्यास्पद प्रकरण बनले आहे. या प्रकरणामुळे आता पुन्हा एकदा सोशल मिडियावर पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे.
ये है पाकिस्तान की हालत, पाकिस्तान की संसद में किसी के पैसे गिर गये, स्पीकर ने पूछा किसके गिर गए…10-12 सांसदों ने हाथ उठा दिया कि वो पैसे उनके हैं… pic.twitter.com/nyO84PVzaK — Rohit R Ranjann (@irohitr) December 9, 2025
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @irohitr नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘पाकिस्तानची ही अवस्था आहे, पाकिस्तानच्या संसदेत कोणाचे तरी पैसे पडले, सभापतींनी विचारले की हे कोणाचे पैसे पडले… १०-१२ खासदारांनी हात वर करून सांगितले की हे पैसे त्यांचे आहेत…’.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.