(फोटो सौजन्य – Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
धुरंधर सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतचं आहे. अशातच थिएटरमधील या नवीन व्हिडिओने आता इंटरनेटवर धुमाकूळ माजवला आहे. व्यक्ती चित्रपट पाहता पाहता रणवीर सिंहच्या कॅरेक्टरमध्ये इतका गुंग झाला की त्याने थेट पीव्हीआरमध्ये सिगारेट ओढायला सुरुवात केली. त्याची ही कृती पाहून आजूबाजूचे प्रेक्षक हादरले आणि लोकांनी हे दृश्ये आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक व्यक्ती सीटवर बसून आरामात चित्रपट पाहत असल्याचे दिसते. यावेळी त्याच्या हातात सिगारेट असते आणि ती सिगारेट ओढत तो चित्रपटाचा आनंद लुटत असतो. काहींनी यावर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, “तो पात्रात थोडा जास्तच गुंतला आहे”. दरम्यान व्यक्तीच्या या प्रकाराचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर वेगाने शेअर केला जात आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @brut.india नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो मुख्य पत्राचा अनुभव घेत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “स्मोकिंग का करत आहे, तो बाहेरची मोकळी हवा घेऊ शकला असता” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आशा आहे की त्याला थिएटरमधून बाहेर काढले गेले असेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






