Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पैसे काढायला गेला अन् केस कापून आला… ! पाटणाच्या ‘हेयर कटिंग SBI ATM’ ने उडवली खळबळ, Viral Video पाहून युजर्स थक्क

Shocking Viral Video : अरे बापरे! ATM मध्ये सुरु झाली हेअर कटिंग सर्व्हिस? पाटणातील अनोख्या व्हिडिओने वेधले लोकांचे लक्ष. व्हिडिओ पाहून युजर्स म्हणाले, "बिहार आहे तर सर्व शक्य आहे".

  • By नुपूर भगत
Updated On: May 13, 2026 | 10:04 AM
पैसे काढायला गेला अन् केस कापून आला... ! पाटणाच्या ‘हेयर कटिंग SBI ATM’ ने उडवली खळबळ, Viral Video पाहून युजर्स थक्क

पैसे काढायला गेला अन् केस कापून आला... ! पाटणाच्या ‘हेयर कटिंग SBI ATM’ ने उडवली खळबळ, Viral Video पाहून युजर्स थक्क

Follow Us
Follow Us:
  • पटणातील एका जुन्या SBI ATM केंद्रात आता चक्क हेअर कटिंग सलून सुरू करण्यात आले आहे.
  • ATMचा बोर्ड आणि सेटअप तसाच ठेवल्यामुळे अनेक लोक पैसे काढण्यासाठी आत जातात आणि सलून पाहून थक्क होतात.
  • या अनोख्या ‘हेयर कटिंग ATM’चा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे कधी काय दिसून येईल ते सांगता येत नाही. इथे आपल्याला हसवणारे, थक्क करणारे तसेच भावूक करणारे अनेक दृष्ये शेअर केली जातात. सोशल मिडियावर ॲक्टिव्ह असल्यास आपण हे व्हायरल व्हिडिओज नक्कीच पाहिले असतील. अलिकडे असाच एक अनोखा व्हिडिओ इथे शेअर करण्यात आला आहे ज्यातील दृष्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. व्हिडिओमध्ये एक अतरंगी एटीएम दिसून आले जिथे लोक पैसे काढण्यासाठी नाही तर चक्क केस कापण्यासाठी जाताना दिसले. मोठा एसबीआयचा फलक, निळे दिवे, काचेचा दरवाजा आणि २४-तास सेवेचा फलक. पण आतमध्ये कॅश मशीनऐवजी चक्क एक हेअर कटिंग सेवा सुरु करण्यात आली होती. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

लग्नसमारंभ बनला आखाडा! वर-वधूमध्ये लग्नाच्या मंडपात सुरु झाली WWE फाईट, पाहून वऱ्हाडीही हादरली; घटनेचा Video Viral

नक्की काय दिसलं व्हिडिओत?

माहितीनुसार सदर व्हिडिओ पाटणातील दानापूर इथला असल्याचे सांगण्यात येत आहे. जिथे सामान्यपणे लोक एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जातात तिथेच या व्हिडिओत मात्र काहीतरी भलंतच घडताना दिसलं. लोक एटीएममध्ये जात तर होते परंतु पैसे काढण्यासाठी नाही तर हेअर कटींग करुन घेण्यासाठी… व्हिडिओमध्ये आपल्याला एटीएमच्या आत एक खुर्ची, त्यावर बसलेला ग्राहक आणि एक माणूस त्याची हेअर कटींग करताना दिसून येतो. सांगण्यात येत आबे की, खरं तर, या जागेवर पूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम केंद्र होते. तांत्रिक आणि सुरक्षेच्या कारणांमुळे बँकेने नंतर ते एटीएम मशीन काढून टाकले. मात्र, संपूर्ण सेटअप आणि फलक जसेच्या तसे ठेवण्यात आले. त्यानंतर घरमालकाने ती जागा भाड्याने दिली, जिथे आता रामू नावाच्या न्हाव्याने आपले सलून उघडले आहे.

In Patna’s Danapur, a closed SBI ATM has been turned into a hair salon. The bank rented out the space, but kept all the ATM signage outside leaving customers shocked to find barbers cutting hair inside! pic.twitter.com/d4CdbpKwME — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 11, 2026

पत्नीच्या रील्समुळे वैतागला नवरा; हरिद्वारमध्ये जिवंत पत्नीच केलं पिंडदान, फोटोवर थुंकला अन् घटनेचा Video Viral

मुख्य म्हणजे एटीएमचा बोर्ड काढण्याऐवजी, रामूने त्याखालीच आपले दुकान सुरु ठेवले ज्यामुळे हा सर्व गोंधळ निर्माण झाला. स्थानिकांच्या मते, अनेकदा लोक पैसे काढण्याच्या आशेने येथे येतात, पण आतील सलून पाहून त्यांना धक्का बसतो. या अनोख्या सलूनचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून याचा व्हिडिओ वेगेवेगळ्या प्लॅटफाॅर्मवर शेअर केला जात आहे.

हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन घेण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून अनेक यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बिहारमध्ये काहीही घडू शकतं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “विचार करा तुम्ही घाईत पैसे काढायला गेलात आणि आत जाताच तुमच्या कानावर पडलं केस कशी कापून हवीत… ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “नवीन सेवा: हेअरकटसाठी कार्ड घाला, दाढीसाठी PIN क्रमांक, आणि डोक्याच्या मालिशसाठी बॅलन्स एंट्री”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral patna sbi atm turned into hair cutting salon viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • ATM
  • bihar
  • funny video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral
1

पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral

प्रँकच्या नावाखाली हद्द केली पार, झोपलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना लावली आग; Viral Video पाहून यूजर्समध्ये संतापाची लाट
2

प्रँकच्या नावाखाली हद्द केली पार, झोपलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना लावली आग; Viral Video पाहून यूजर्समध्ये संतापाची लाट

Bihar : सतत रडत होते बाळ, आवाज सहन न झाल्याने आईनेच कोयत्याने चिरला ६ महिन्यांच्या मुलीचा गळा; घटनेनंतर आत्महत्येचा प्रयत्न
3

Bihar : सतत रडत होते बाळ, आवाज सहन न झाल्याने आईनेच कोयत्याने चिरला ६ महिन्यांच्या मुलीचा गळा; घटनेनंतर आत्महत्येचा प्रयत्न

Viral : “भारतीय म्हणून मरायचे आहे”, ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ
4

Viral : “भारतीय म्हणून मरायचे आहे”, ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.