
मी प्रेग्नंट आहे, प्लिज गाडी थांबवा... गरोदर महिलेला स्कुटरने ओढत नेलं, पोलिसांकडूनच घडले गैरवर्तन; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक पोलिस अधिकारी स्कूटर चालवताना दिसून येतो. यावेळीच त्याच्या समोर महिला उभी असते आणि तिला गाडीने ओढतच तो तिला पुढे घेऊन जातो. ती महिला त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. ती ओरडते आणि पोलिसांना गाडी थांबवण्याची विनंती करते. महिला विनवणी करते की, “मी गरोदर आहे. कृपया असे करू नका,” पण पोलीस अधिकारी तिचे काहीही ऐकायला तयार नसतो. या घटनेत महिला सुमारे २० मीटर ओढत गेली. शेवटी, पोलिसाने गाडी थांबवली. त्यानंतर ती त्याच्यासोबत पोलिस स्टेशनला गेली.
हे जोडपे मरीन ड्राइव्हला भेट देण्यासाठी आले होते. यू-टर्न घेण्याऐवजी, ते त्यांच्या स्कूटरवरून उतरले आणि चुकीच्या दिशेने गाडी चालवू लागले. तेवढ्यात एका पोलिसांनी त्यांना थांबवले. जेव्हा वाहनाची कागदपत्रे तपासली गेली तेव्हा त्यावर आधीच १२,००० रुपयांचे चलन असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी वाहन जप्त करून पोलिस ठाण्यात नेण्याची प्रक्रिया सुरू केली. तिथून वाद वाढला. महिलेने वारंवार विनंती करूनही, पोलिस अधिकाऱ्याने ऐकण्यास नकार दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
ये पटना की मरीन ड्राइव की तस्वीरें है, डबल इंजन सरकार की पुलिस गर्भवती महिला को सड़कों पर गाड़ी से रौंद रही है, मोदीजी ने ₹10,000 में वोट के साथ माँ – बहनों की जिंदगी भी खरीद ली है? pic.twitter.com/COy8Skh4Fx — Indian Youth Congress (@IYC) November 18, 2025
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ @IYC नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच युजर्सने पोलिसांच्या या वागणुकीवर संताप व्यक्त केला तर काहींनी जोडप्याचीही यात चूक असल्याचे स्पष्ट केले. एका युजरने लिहिले, “लज्जास्पद. इतके सुशिक्षित आयपीएस अधिकारी अशा पोलिसांना का नियंत्रित करू शकत नाहीत?कायदा आणि सोशल मीडियावरील जनतेचा विश्वास वाढला आहे, त्यामुळे पोलिसांनी हे समजून घेतले पाहिजे की ते आता केवळ त्यांच्या अधिकाऱ्यांच्याच देखरेखीखाली नाहीत, तर त्यांची प्रत्येक कृती संपूर्ण समाजाच्या देखरेखीखाली आहे. पोलिस सुधारणा आवश्यक आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.