(फोटो सौजन्य – Instagram)
काय दिसलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये चित्रपटाचा संपूर्ण शूटिंग क्रू उपस्थित असल्याचे दिसून येते. कॅमेरे, लाईट्स, मायक्रोफोन आणि अगदी दिग्दर्शक देखील… यानंतर व्हिडिओमध्ये असे काही दृश्य दिसून येते ज्याचा कोणी कधी स्वप्नातही विचार केला नसेल. व्हिडिओमध्ये दिग्दर्शक “ॲक्शन” असे ओरडतो ज्यानंतर वाघ लगेच हरणाच्या दिशेने धावतो, तो हरणावर हल्ला करतो आणि त्याला खाणार तितक्यात दिग्दर्शक “कट” असे ओरडते. आश्चर्याची बाब म्हणजे, त्याच्या एका शब्दातच वाघ लगेच थांबतो आणि हरणापासून दुर होतो. दिग्दर्शकाच्या एका शब्दावर दोन्ही प्राणी स्तब्ध उभे राहतात जणू काही घडलेच नाही. हे दृश्य आता सर्वांनाच अचंबित करत आहे. आता व्हिडिओतील हा प्रकार खरा की खोटा याची माहिती मिळाली नसली तर ही अनेकजण याला एआय मानत आहेत. काहींनी वाघाला एका चांगल्या ॲक्टरची उपमा दिली आहे तर काहींनी याला बनावटी दृश्य असल्याचे म्हटले आहे.
हा व्हिडिओ @multiversematrix नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे खरे असू शकत नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जबरदस्त यार! आता मला विश्वास आहे की माणूस काहीही करू शकतो…” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सर्वात तर्किय एआय व्हिडिओ”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






