(फोटो सौजन्य – X)
फसवणुकीविषयी सांगताना अंकितने म्हटले की, त्याने स्विगी इन्स्टामार्ट वरून ५ ग्रॅम सोन्याचे नाणे ऑर्डर केले होते, परंतु डिलिव्हरीमध्ये त्याला १ रुपयांचे नाणे मिळाले. तथापि, कंपनीने ताबडतोब ऑर्डर रद्द केली आणि त्याला त्याचे पैसे परत मिळाले, परंतु डिलिव्हरी पार्टनर खूप नाराज झाला. त्याने डिलिव्हरी व्यक्तीला पार्सल उघडण्यास सांगितले आणि त्याचा व्हिडिओ बनवला. त्याने एक्स वर व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. अंकितने लोकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि पॅकेट तपासल्याशिवाय ओटीपी देऊ नये असा सल्ला दिला आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, व्यक्ती पॅकेट खोलून आपलं पार्सल ओपन करताना दिसून येतो. पार्सल पूर्णपणे पॅक केलेले असते पण जेव्हा यातून खरी गोष्ट बाहेर येते तेव्हा ग्राहकांसह रायडरलाही धक्का बसतो. आतील पॅकेट उघडताच यातून सोन्याचं नाही तर १ रुपयांचं नाणं बाहेर पडतं. आपली चुकीची डिलिव्हरी पाहताच ग्राहकाला धक्का बसतो पण सुदैवाने कंपनी त्याला रिफंड करते. तुमच्यासोबतही अशी घटना होऊ नये असे वाटत असल्यास ऑनलाईन शॉपिंग करताना थोडी सावधानता बाळगा. तुमचे एक चुकीचे पाऊल तुमचे मोठे नुकसान करू शकते.
Just got a 1 rupee coin instead of 5g Gold Coin from @SwiggyInstamart . While the order has been cancelled, and I have got my money back, the delivery partner was ready to cry. The whole opening was captured on a video. I hope they are fair with the partner. Please be careful… pic.twitter.com/iYYHtvsy0k — Ankit Dewan (@ankitdewan) December 9, 2025
हा व्हिडिओ @ankitdewan नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ते बावळट लोक आहेत जे ऑनलाईन गोल्ड विकत घेतात, सोन्यासारखी वस्तू दुकानात जाऊन खरेदी करायला हवी” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “माझा फक्त १ प्रश्न आहे. का? इंस्टामार्ट वरून टोमॅटो / कांदा ऑर्डर करणे समजण्यासारखे आहे, ५ ग्रॅम सोने का? ते ते २ किंवा ३ ग्रॅमच्या किमतीत देत होते का?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला अजूनही ऑनलाईन गोष्टी मागवायला भीती वाटते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






