
हातात वरमाला घेऊन तयार होता वर, वधूने उडी मारत भरमांडवातून काढला पळ, लग्नसमारंभातील Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये लग्नाचे सर्व विधी सुरळीत सुरु असल्याचे दिसते. पाहुणुमंडळी जमलेली असतात, वर आणि वधू हातात वरमाला घेऊन उभे असतात आणि याचवेळी अचानक वधू जयमाला घेऊन भरमंडवातून पळून जाते. ही घटना सर्वांसाठीच अनपेक्षित होती. सांगितले जात आहे की, वधूचा प्रियकर मंडवात आल्याने वधूने त्याच्यासोबत लग्नातून पळ काढला.
या घटनेनंतर, लग्नाचा आनंद काही क्षणांतच मोठ्या गोंधळात बदलला. काय झाले हे उपस्थित पाहुण्यांना समजूच शकले नाही. रागाच्या भरात काही लोकांनी प्रियकराला मारहाण करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली.या घटनेनंतर, नवरदेवाने लग्न करण्यास स्पष्टपणे नकार दिला आणि तो आपल्या वऱ्हाडी मंडळींसह परत गेला. नवरदेवाच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुलीच्या कुटुंबीयांनी हे प्रकरण मुद्दाम त्यांच्यापासून लपवले होते.
The bride left the wedding midway & ran away with her lover. Why couldn’t she tell the groom or his family beforehand? 🥲 pic.twitter.com/LSBtndRglZ — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 30, 2026
अद्भुत, अविश्वसनीय आणि दुर्लभ… आकाशात दिसून आला सप्तरंगी ढग, पाहून सर्वांचेच डोळे दिपले; Video Viral
या घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भावाने वरात आखली, हॉल बुक केला, डीजेचे पैसे दिले; आणि तिने मात्र सप्तपदीच्या अगदी मध्यातच ‘उसेन बोल्ट’सारखी धूम ठोकली. संवाद शून्य, पण ड्रामा मात्र १०००! आणि कथेतला पुढच्याच पातळीचा धक्कादायक वळण (Plot twist) म्हणजे: “माफ करा, पण माझं हृदय तर दुसऱ्याच मंडपात राहून गेलंय!” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “’3 इडियट्स’मधला तो सीन सत्यात घडवून आणला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ती म्हणाली असती, पण तरीही लग्नासाठी जबरदस्ती केली!”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.