Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भयंकर! चक्रीवादळाने महिलेला अक्षरशः ओढलं अन् क्षणार्धात ती थेट हवेत उडून गेली, पाहणाऱ्यांचाही अंगावर आला काटा; Video Viral

Tornado Video : निसर्गाच्या प्रकोपात महिला परी बनून हवेत उडाली जे दिसलं ते भयानक होतं. चक्रिवादळाचा एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून यातील दृष्यांनी लोकांच्या अंगावर काटा आणला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 21, 2025 | 10:49 AM
भयंकर! चक्रीवादळाने महिलेला अक्षरशः ओढलं अन् क्षणार्धात ती थेट हवेत उडून गेली, पाहणाऱ्यांचाही अंगावर आला काटा; Video Viral

भयंकर! चक्रीवादळाने महिलेला अक्षरशः ओढलं अन् क्षणार्धात ती थेट हवेत उडून गेली, पाहणाऱ्यांचाही अंगावर आला काटा; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • जोरदार वाऱ्याच्या झोताने महिला क्षणार्धात हवेत ओढली गेल्याचे भीषण दृश्य दिसते.
  • घटनेचे ठिकाण अद्याप अज्ञात असून अनेक युजर्सनी व्हिडिओच्या सत्यतेवर संशय व्यक्त केला आहे.
  • काही युजर्सने निसर्गाच्या भयावह रूपावर आश्चर्य व्यक्त केले.
मानव कितीही प्रगत झाला तरीही निसर्गाच्या प्रकोपासमोर त्याचे काहीही चालू शकत नाही. सामान्य वाटणारी घटना अचानक आपत्तीत बदलते आणि त्यानंतर जे घडतं ते भयानक असतं. अलिकडे सोशल मिडियावर एका थरारक चक्रिवादळाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. वादळाचा प्रकोप इतका जास्त होता की त्याने क्षणार्धात एका महिलेला आपल्याकडे ओढलं आणि ती हवेतच नाहीशी झाली. घटनेचा व्हिडिओ आता इंटरनेटवर शेअर करण्यात आला असून लोक यातील दृष्ये पाहून थक्क झाली आहेत. व्हिडिओत काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

मुंबईच्या वरळी सी फेसवर दिसला समुद्राचा सर्वात सुंदर मासा… ‘डॉल्फिन’, पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी; अद्भुत Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओची सुरुवात एका सामान्य दृश्याने होते. एक महिला तिच्या घराबाहेर उभी असलेली दिसते. आकाश ढगाळ आहे, पण सुरुवातीला कोणताही धोका दिसत नाही. हलका वारा वाहत आहे आणि हवामान थोडे उथळ वाटते. असे दिसते की पाऊस पडणार आहे. पण काही सेकंदातच परिस्थिती वेगाने बदलते आणि शांत वातावरण अचानक भयावह बनते. जसजसा वेळ जातो तसतसा वाऱ्याचा वेग वाढतो. काळे ढग दाट होतात आणि वातावरणात एक विचित्र शांतता पसरते. अचानक, जोरदार वाऱ्यांसह एक वादळ निर्माण होते. चिखल, धूळ आणि लहान कचऱ्याचे ढग हवेत फिरतात आणि आकाशाकडे वर येतात. हे दृष्य इतक्या वेगात बदलते की महिलेला नक्की काय घडत आहे याचा अंदाज लावता येत नाही आणि तितक्यातच परिस्थिती हाताबाहेर जाते. चक्रिवादळ महिलेच्या घराजवळून जात असतानाच ती या वादळात ओढली जाते आणि काही क्षणातच ती हवेच्या या वादळात गायब होते. हे दृष्य इतके भयानक असते की पाहणाऱ्यांच्या अंगावरही काटा येतो.

बहुत तेज़ हवा है 1 कुंटल की औरत भी उड़ गई हवा के साथ pic.twitter.com/qPeUy7VRUF — Muhammad Haroon (@Razvi_Sher7) December 20, 2025

निसर्गाचा रौद्र अवतार! जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर कोसळली वीज, दुबईच्या क्राउन प्रिन्सने शेअर केला थरारक Video

दरम्यान हे दृष्य नक्की कुठले आहे याची अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. व्हिडिओतील दृष्ये खरी आहेत की खोटी यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. काहींनी दृष्यांवर आश्चर्य व्यक्त केले आहे तर काहींनी हे दृष्य एआय निर्मित असल्याचे म्हटले आहे. एका युजरने लिहिले आहे, “सध्या हे नैसर्गिक नाहीये, ते नक्कीच एआय आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखे दिसते आणि निसर्गाचे हे रूप देखील खूप भयानक आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “निसर्गाचे खरे रूप केवळ सुंदरच नाही तर धोकादायक देखील आहे आणि ते आपल्याला नम्र राहण्यास शिकवते”. हा व्हिडिओ @roshnipar0786 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral the tornato literally dragged woman and she flew straight into the air viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 09:02 AM

Topics:  

  • Cyclone
  • shocking viral news
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

चीनमध्ये रोबोट्सचा स्टेजवर जलवा! जबरदस्त डान्सने केलं जगला हैराण, मस्कही थक्क, VIDEO VIRAL
1

चीनमध्ये रोबोट्सचा स्टेजवर जलवा! जबरदस्त डान्सने केलं जगला हैराण, मस्कही थक्क, VIDEO VIRAL

बापरे! व्हिडिओ गेमच्या नादात व्यक्तीने स्वतःला तब्बल 2 वर्ष खोलीत कोंडलं, दरवाजा उघडताच दिसले किळसवाणे दृश्य; Video Viral
2

बापरे! व्हिडिओ गेमच्या नादात व्यक्तीने स्वतःला तब्बल 2 वर्ष खोलीत कोंडलं, दरवाजा उघडताच दिसले किळसवाणे दृश्य; Video Viral

लोको पायलटचं रोमँटिक सरप्राईज! घरामागून ट्रेन धावताच हॉर्नमध्ये वाजवलं ‘I Love You’; पती-पत्नीचा क्यूट मूमेंट व्हायरल
3

लोको पायलटचं रोमँटिक सरप्राईज! घरामागून ट्रेन धावताच हॉर्नमध्ये वाजवलं ‘I Love You’; पती-पत्नीचा क्यूट मूमेंट व्हायरल

निसर्गाचा रौद्र अवतार! जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर कोसळली वीज, दुबईच्या क्राउन प्रिन्सने शेअर केला थरारक Video
4

निसर्गाचा रौद्र अवतार! जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर कोसळली वीज, दुबईच्या क्राउन प्रिन्सने शेअर केला थरारक Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.