(फोटो सौजन्य – Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक महिला घर साफ करताना दिसून येते. सुरुवातीला सगळं काही सामान्य वाटतं, पण पुढच्याच क्षणी दृश्य आश्चर्यकारक बनतं. ती महिला तिच्या बाल्कनीतून घराच्या बाहेर एका लहान जागेवर उभी राहते आणि घराच्या बाहेरील भिंत कापडाने पूसून स्वच्छ करु लागते. यावेळी तिने दोन्ही हातांनी ग्रिलला पकडलेले असते आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून तिची ही स्वचछता सुरु असते. इतक्या उंचीवर उभे राहून घराची स्वच्छता करणे खरंतर धोकादायक ठरु शकते. एक छोटीशी चूक मोठी दुर्घटना घडवून आणू शकते. महिलेचा या पराक्रमावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. काहींनी फसफाईपेक्षा स्वतःचा जीव महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे तर काहींनी हा महिलेचा निव्वळ गैरप्रकार आहे असे म्हटले आहे.
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @rvbjmemes नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ताईंमा साफसफाईचा आजार जडला आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जग यावर काय बोलत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ही तर नेक्ट लेव्हर स्वच्छता प्रेमी आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






