(फोटो सौजन्य – Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओच्या सुरुवातीला, तुम्हाला शहरातील एक माणूस दिसेल जो जंगलात गेला होता. या माणसाने त्याच्यासोबत आणलेला चॉकलेट लॉलीपॉप त्या आदिवासी माणसाला खायला दिला. आदिवासी माणूस लॉलीपॉप देताच त्याकडे लक्षपूर्वक पाहायला लागतो. मग तो रॅपर फाडतो आणि त्याची चव घेऊ लागतो. सुरुवातीला तो हळूहळू याला खातो पण चव समजताच तो त्या चॉकलेट लॉलीपॉपला चावत मजेत त्याचा आस्वाद घेऊ लागतो. खाताना संपूर्ण वेळ तो याकडे एकटक बघत असतो की हे नक्की आहे काय…व्हिडिओत खाताना त्याचे हावभाव बदलल्याचेही दिसून येते. आदिवासीने चॉकलेट खाताना दिलेली ही प्रतिक्रिया आता यूजर्सना हसू अनावर करत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ भारतातील आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हलर आणि व्लॉगर विनोद कुमार यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट @roamingvinu वर शेअर केला आहे. व्हिडिओनुसार, ते सध्या पूर्व आफ्रिकेतील देशातील टांझानियाच्या आदिवासी भागात सहलीवर आहेत. या प्रवासादरम्यान त्यांनी त्यांच्यासोबत खाण्यापिण्याच्या गोष्टी घेतल्या होत्या. विनोद कुमार ज्या आदिवासींना भेट देत आहेत त्यांना पृथ्वीवरील शेवटची शिकारी जमात म्हणून ओळखले जाते. या आदिवासी समुदायाला हडझाबे शिकारी जमात म्हणून ओळखले जाते. ते टांझानियाच्या सेंट्रल रिफ्ट व्हॅलीमध्ये राहतात.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






