
Viral video: अरे बापरे! कुत्र्यालाही लागली पाणीपुरीची चटक ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
हा व्हिडिओ ‘doobieismygolden’ नावाच्या अकाउंटवरून पोस्ट केला गेला आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की एक सुंदर सोनेरी रंगाचा कुत्रा समोर बसला आहे आणि त्याचा मालक त्याला एक-एक पाणीपुरी भरवत आहे.
सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे तो कुत्रा किती शांतपणे वाट बघतोय. आपण पाणीपुरीच्या गाडीवर जसे पुढच्या पुरीसाठी वाट बघतो, अगदी तसाच तो पण पुढच्या पाणीपुरीसाठी वाट बघतोय. घाई नाही, गडबड नाही. एकदम सभ्यपणे. हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाख 20 हजार लोकांनी पाहिला आहे आणि 40 हजारांहून जास्त लोकांनी लाईक केला आहे. लोक या व्हिडिओवर तुफान कमेंट करत आहेत.
आता तुम्ही म्हणाल कुत्र्याला पाणीपुरी दिली तर त्याला त्रास होईल. पण थांबा, या कुत्र्याच्या मालकाने सांगितलं आहे की ही साधी पाणीपुरी नाही, ही खास कुत्र्यांसाठी बनवलेली हेल्दी पाणीपुरी आहे.
त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय, “पॉ पॉ, अजून एक पाणीपुरी द्या प्लीज.”आणि पुढे त्याने सांगितलं की मी माझ्या कुत्र्याच्या खाण्याची खूप काळजी घेते. ही आमची डॉग-फ्रेंडली पाणीपुरी आहे. यात बाहेरची काहीच नाही. आतमध्ये रताळ्याचं सारण आहे, थोडी पुदिन्याची पानं, कोथिंबीर आणि सफरचंद आणि किवीचं पाणी आहे. म्हणजे सगळं नैसर्गिक आणि हेल्दी.
व्हिडिओवर एक गंमतीशीर ओळ पण लिहिली आहे – “जेव्हा तुम्हाला कळतं की तुमच्याकडे स्वतःची इच्छा आहे आणि एक पॉ-पॉ पण आहे.” म्हणजे हा कुत्रा आता स्वतःच्या मनाने पाणीपुरी मागतोय.
हा व्हिडिओ पाहून लोकांच्या कमेंट्स पण एकदम भारी आहेत. एकाने लिहिलंय, “पाणीपुरीला शेवटी तिचा खरा फॅन मिळाला!”दुसरा म्हणतोय, “हा तर आपल्यापेक्षा जास्त पेशन्स ठेवून पाणीपुरी खातोय.”तर कोणी म्हणतंय की हा पुढच्या जेवणाचा प्लॅन आत्तापासूनच करतोय.खरंच, हा कुत्रा व्हिडिओमध्ये इतका क्यूट दिसतोय की कोणीही त्याच्या प्रेमात पडेल. त्याचा तो निरागस चेहरा आणि पाणीपुरीसाठीची ती वाट पाहणं, हे सगळं बघण्यासारखं आहे.
अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल
आजकाल लोक आपल्या पाळीव प्राण्यांसाठी खूप काही करतात. त्यांच्यासाठी केक, बर्थडे पार्टी, खास जेवण. तसाच हा प्रकार आहे. आपल्याला पाणीपुरी आवडते तर आपल्या कुत्र्याला का नाही? पण त्याच्या तब्येतीला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन अशी हेल्दी पाणीपुरी बनवणं हे खरंच कौतुकास्पद आहे.तुम्ही अजून हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा. तुमचा दिवस एकदम फ्रेश होईल याची गॅरंटी.