(फोटो सौजन्य: Instagram)
हा व्हिडिओ @zikiguy आणि @mayatherobot या दोन इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये क्रिएटर्सने रोबोटला क्लासिकल ट्रेनिगचे प्रशिक्षण कसे दिले हे देखील दाखवले. रोबोटच्या गळ्यात चोकर नेकलेस घातलेला असतो, पायात बूट असतात तर पेहरावात तिला चोळी आणि घागरा असे कपडे परिधान केलेले असतात. रोबोटच्या डोक्यावर मऊ केसांचा विग घातलेला असतो आणि या सुंदर साजातच ती क्लासिकल नृत्य सादर करत असते. रोबोटला असा पारंपारिक डान्स करताना पाहून आता यूजर्स चांगलेच थक्क झाले असून व्हिडिओला सोशल मिडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. दरम्यान या रोबोटचे नाव माया आहे.
View this post on Instagram
धक्कादायक! मुलीने केला प्रेमविवाह; संतापलेल्या कुटुंबाने जिवंतपणीच मुलीचा घातला ‘तेरावा’, VIDEO समोर
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘ह्युमनॉइड रोबोटद्वारे सादर केलेले जगातील पहिले भारतीय शास्त्रीय नृत्य!’. तथापि, या दाव्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. पोस्टनुसार, हा प्रकल्प मास्टर्स युनियन युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत २ लाखाहून अधिकच्या लाईक्स मिळाल्या असून अनेक यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “रोबोट चित्रपट आता प्रत्यक्षात उतरत आहे, खरंय”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला समजत नाहीये, त्याने तो रोबोट विकत घेतला की बनवला?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “भावा आता तू डान्सर्सच्या नोकऱ्या सुद्धा खाणार का?”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






