Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हवेत गरुडांचा थरारक खेळ, आकाशातच एकमेकांना शिकार हँडओव्हर करताना दिसले… पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले; Video Viral

Eagle Food Transfering Video Viral : आपण दोघं भाऊ सोबत मिळून खाऊ...! हवेतच गरुडाने भक्ष्याला दुसऱ्या गरुडाच्या स्वाधीन केलं पण असं का? शिकाऱ्यांच्या या खेळीचं नक्की कारण काय? व्हिडिओतून जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 11, 2025 | 02:57 PM
हवेत गरुडांचा थरारक खेळ, आकाशातच एकमेकांना शिकार हँडओव्हर करताना दिसले... पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले; Video Viral

हवेत गरुडांचा थरारक खेळ, आकाशातच एकमेकांना शिकार हँडओव्हर करताना दिसले... पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • दोन गरुडांनी हवेत केलं फूड ट्रान्सफर
  • व्हिडिओ प्रचंड होतोय व्हायरल
  • फूड ट्रान्सफरिंग काय असत ते जाणून घ्या
निसर्ग नवनवीन गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आणत असतो, ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. सोशल मिडियावर अशा घटनांचे व्हिडिओज आपल्याला नेहमीच शेअर केले जातात. अशीच एक अनोखी घटना आता इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे ज्यात हवेच्या राक्षसांचा अनोखा थरार दिसून आला. व्हिडिओमध्ये गरुड आपल्या शिकाऱ्याला दुसऱ्या गरुडाला देताना दिसून आला. शिकार हँडओव्हर करण्याची ही प्रक्रिया आकाशात पार पडली जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चला व्हिडिओतील या दृश्यांविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Fact Check: चीन सीमेवर भारतीय जवानांना दिल जात नाहीये अन्न? दुःख व्यक्त करताना Soldier च्या डोळ्यात आले अश्रू; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, दोन गरुड हवेत उडताना आणि त्यांची शिकार एकमेकांना देताना दिसून येतात. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की एक गरुड आकाशातून वेगाने उडत आहे, त्याने त्याच्या पंजात भक्ष्याला पकडलेले आहे. तो आकाशात भक्ष्याला घेऊन उडतच असतो तितक्यात तिथे दुसरा गरुड येतो आणि तो पहिल्या गरुडाच्या पंजातून भक्ष्याला आपल्या पंजात पकडतो. गरुडासारखा प्राणी जो आपल्या शिकाऱ्याला कधीही आपल्या पंजातून सोडत नाही हा यावेळी स्वतःच आपल्या भक्ष्याला दुसऱ्याला देत आहे हे पाहून सर्वच थक्क झाले.

एकमेकांना शिकार सोपवण्याचे हे दृश्य योगायोग नाही, तर गरुड असं अनेकदा करतात. खरं तर, मादी गरुड अनेकदा नर गरुडाकडून शिकार घेते जेणेकरून ती त्याला घरट्यात घेऊन जाऊ शकेल आणि पिलांना खाऊ घालू शकेल. याला फूड ट्रान्सफर किंवा एअर फूड पास असे म्हटले जाते. जिथे नर गरुड शिकार पकडतो आणि हवेत मादी गरुडाला देतो. यामुळे मादी गरुडाला वारंवार शिकार करावी लागत नाही आणि तिची ऊर्जा वाचते. त्या बदल्यात, मादी गरुड तिच्या घरट्याचे आणि पिलांचे रक्षण करते.

भारतीय व्यवस्थेने घेतला आणखीन एक बळी? मित्राच्या लग्नासाठी आलेल्या स्वीडन तरुणाचा नवी मुंबईत दुर्दैवी मृत्यू; Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @sciencegirl नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ते आकाशातील टीमवर्क आहे… प्रेम आणि जगणे, सर्व एकाच सुंदर झटक्यात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “टीमवर्क स्वप्न साकार करतो” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भाऊ अवकाशात सामानाची डिलिव्हरी करतोय”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news eagle transfering prey to another eagle video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 02:56 PM

Topics:  

  • birds
  • shocking viral news
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

अंगणात सहज दिसणारे पक्षी आता नव्या पिढीला दिसेनासे झालेत! भारतातील ६०% पक्ष्यांची घट
1

अंगणात सहज दिसणारे पक्षी आता नव्या पिढीला दिसेनासे झालेत! भारतातील ६०% पक्ष्यांची घट

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
2

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
3

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral
4

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.