थेट मृत्यूशी गाठ! सापाशी पंगा घेणं पठ्ठ्याला पडलं महागात; कोब्राने फणा काढला अन्..., VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण पळत्या सापाच्या पाठीमागे धावत आहे. अचानक तरुण सापाची शेपटी पकडतो आणि त्याला उचलून घेतो. मात्र यामुळे साप चवळतो आणि थेट तरुणाच्या छातीवर पलटवार करतो. साप फणा काढून त्याच्या छातीवरच उभा राहतो. सापाचा वार इतका भयानक होता की व्हिडिओ पाहणाऱ्याच्या काळजाचाही ठोका चुकेल. सापाची चपळाई पाहून तरुणाचेही हातपाय थरथरु लागले आहेत. परंतु यानंतरही तरुणाला गप्प बसवत नाही. तो थेट सापाच्या मागे धावू लागतो. यावेळी मात्र साप त्याला सोडत नाही आणि थेट त्याच्या तोंडवर वार करतो. ज्यामुळे बचाव करताना थेट जमिनीवर पडतो. पण तरुणाला मात्र काही अक्कल येत नाही. पुन्हा एकदा सापाची शेपटी पकडायला जातो.
स्टंटचे वाढते प्रमाण
अलीकडे अशा धोकादायक स्टंटचे प्रचंड प्रमाण वाढले आहे. सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी, लाईक्स आणि व्ह्यूजसाठी लोक कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे. कधी कुठे बाईक स्टंट, तर कधी कुठे कार स्टंट, कुठे धावात्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रकार तर कधी धोकादायक पुलावरुन उडी मारण्याचा थरार सुरुच असतो. या स्टंटच्या नादात लोक स्वत:सोबत दुसऱ्यांचाही जीव धोक्यात घालतात.
अतिशहाणपणा नडला! पठ्ठ्यानं थेट भर समुद्रात घातली फॉर्च्युनर; पुढं जे घडलं भयंकर, VIDEO VIRAL
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @nituchowdhury222 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. परंतु अशी व्हिडिओंना लाईक्स मिळत असल्यानेच लोकांचे धोकादायक स्टंट करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
इतकी पण काय लाचारी? थेट धावत्या बाईकवरच तरुणाने उघडलं ऑफिस; VIDEO पाहून नेटकरी हैराण
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






