चोराने चोरी न करता घराची साफसफाई केली
वॉश्गिंटन: तुम्ही आत्तापर्यंत अनेक चोरीच्या घटना ऐकल्या असतील. कोणी बॅंक लुटली, तर कोणी एटीअम फोडले, कोणी घरातील तिजोरीतून सगळे दागिने लंपास केले. यांसारख्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. सध्या चोरीचे प्रमाण देखील भरपूर वाढले आहे. पण तुम्ही कधी अशा चोराबद्दल ऐकले आहे का जे घरात येऊन साफसफाई करून जातो. ऐकून आश्चर्य वाटले ना? पण असे खरंच घडले आहे. एक देशातून अशी घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही अमेरिकेच्या वॉश्गिंटनमध्ये घडली आहे. येथे एका चोराने असे काही केले आहे की, ते पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. हा चोर कोणत्याही प्रकारची चोरी करत नाही. तर चक्क लोकांच्या घरात जाऊन राहतो. घराची साफसफाई करतो. टिव्ही बघतो, जेवण बनवून खातो. विशेष म्हणजे जेवल्यानंतर तो भांडी देखील धूऊन ठेवतो. आश्चर्याची बाब म्हणजे या चोराने कोणत्याही घरातून चोरी केली नाही.
व्यक्तीचे विचित्र वर्तन
मिळालेल्या माहितीनुसार 2019 मध्ये बोस्टनमध्ये अशीच एक घटना घडली होती, ज्यामध्ये एका व्यक्तीने घरात प्रवेश केल्यानंतर ते स्वच्छ केले आणि टॉयलेट पेपरपासून गुलाब बनवून दिले. तशीच घटना अमेरिकेत घडली आहे. एका व्यक्तीने सांगितले की, चोराने किचनची खिडकी तोडून घरात प्रवेश केला. त्याने स्वयंपाकघर वापरले आणि स्वतःसाठी स्वयंपाक केला. भांडी साफ करून आंघोळ केली. एवढेच नाही तर विखुरलेले कपडे व्यवस्थित करून ठेवले. यानंतर तो माणूस काहीही न चोरता तेथून पळून गेला. जाण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी टाकली. जी चिठ्ठी वाचून घराचा मालकही हैराण झाला.
हे देखील वाचा – बाप रे! माणसाचा मगरीवर हल्ला; लोक म्हणाले, इतिहासात पहिल्यांदाच… Video Viral
मालकही हैराण
घर मालकाने सांगितले की, मी सकाळी घरी पोहोचलो तेव्हा स्वयंपाकघरात एक चिठ्ठी पडलेली दिसली. त्या चिठ्ठीत लिहिले होते, ‘मला अन्नाची नितांत गरज होती. मी तुमच्या घरात शिरलो. जेवलो, आंघोळ केली, मला माफ करा.’ मालकाने पुढे सांगितले की मनोरंजक गोष्ट म्हणजे त्याने भांडी देखील धुतलेली होती त्यामुळे मला वाटते की तो एक चांगला बदमाश होता. इतकंच नाही तर रात्री झोपून त्याने ब्लँकेटची घडी घालून देखीली ठेवली होती. मी ती चिठ्ठी वाचल्यावर काय करू ते कळत नव्हतेे. पोलिसांना सांगू की काय करू असा प्रश्न मला पडला होता.