फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियाच्या जमान्यात कधी काय पाहायला मिळेल सांगता येत. कधी असे व्हिडीओ समोर येतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. कधी असे व्हिडीओ पाहायला मिळतात की, हसावे की, रडावे. सोशल मीडिया फेमस होण्यासाठी लोक इतके धोकादायत स्टंट करतात की असे व्हिडीओ पाहून थरकाप उडतो. अनेकदा असे स्टंट करणारे लोक आपला जीव धोक्यात घालतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
एका व्यक्तीने असे काही केले आहे की, व्हिडीओ पाहून अनेकांचा जीव टांगणीला लागला. अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. वास्तविक एका, तरूणाने मगरीवर हल्ला केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ अद्याप कुठला आहे ते समजलेले नाही. परंतु अनेकांनी असे म्हटले आहे की, इतिहासात पहिल्यांदाच असे काही घडले असेल.
व्हिडीओत नेमकं काय?
तुम्हाला माहितीच असेल की, मगरी किती हिंसक असतात. त्या त्यांचा शिकार अशा पद्धतीने करतात की कोणाला स्वत:चा जीव वाचवण्यासाठी एक सेकंद देखील मिळणार नाही. पण आज उलट घडले आहे एका व्यक्तीने मगरीचा शिकार केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका तलावाच्या किनाऱ्याला एक मगर शांत बसलेली दिसत आहे. तर दुसरीकडे एक माणूस तलावात अर्धा पाण्याखाली आहे. तो अगदी सावकाश पोहत त्या मगरीजवळ जातो आणि अचानक उडी मारतो. ज्यामुळे मगर घाबरून पटकन पाण्यात जाते. त्यानंतर पुढे काय घडले ते अद्याप कळालेले नाही. पण हे व्हिडीओ व्हायरल होण्यासाठी केलेला स्टंट आहे की, खरेच असे घडले आहे? असा प्रश्न पडतो.
हे देखील वाचा- तु फक्त I Love you म्हण, रिचार्ज फ्री; ऑफर देणाऱ्याला महिलांनी शिकवला चांगलाच धडा
व्हायरल व्हिडीओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हो व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर a.xuan.r अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि शेअर केले आहे. हा व्हिडिओ पाहून लोक हैराण झाले आहेत. ही एक दुर्मिळ घटना आहे, कारण लोक सहसा मगरींपासून लांब राहतात. मात्र या तरुणाने आपले अदम्य साहस दाखवत थेट मगरीवर हल्ला केला, जे सर्वसाधारणपणे अशक्य मानले जाते. या तरुणाने मगरीवर काही विशिष्ट कारणास्तव हल्ला केला होता की तो एक प्रकारचा स्टंट होता? असा अंदाज हा व्हिडीओ पाहून बांधत आहेत. काही लोक याला शौर्याचे उदाहरण मानत आहेत, तर काही लोक याला मूर्खपणाचे पाऊल म्हणत आहेत.