viral speech of child on republic day video goes viral
काल आपल्या भारत देशाच्या 76वां प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने देशभरात साजरा करण्यात आला. यानिमित्त अनेक शाळांमध्ये झेंडा फडकवण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी या निमित्त भाषणे देखील केली. सध्या असाच एक भाषणाचा चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे की, तुम्ही देखील पोट धरुन हसाल्याशिवाय राहणार नाही.
या व्हिडिओत चिमुकल्याने 26 जानेवरी निमित्त भन्नाट भाषण दिले असून सगळेजण खळखळून हसले आहेत. हा व्हिडिओ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये 26 जानेवारीचा फायदा या चिमुकल्याने सांगितला आहे. चला तर मग जाणून घेऊयात नेमका काय म्हणले आहे या चिमुकल्याने.
या चिमुकल्याने 26 जानेवारी निमित्ताने दिलेल्या भाषणाची सुरुवात आणि शेवट अगदी अनोखा केला आहे. चिमुकल्याने म्हटले आहे की, 26 जानेवरी खूप छान असतो, 26 जानेवारी दिवशी खूप मजा येते असे म्हणून सुरुवात केली आहे. त्यानंतर त्याने 26 जानेवारी 25 जानेवारी नंतर येतो, 26 जानेवारी 26 जानेवारीला येतो असे म्हणताच सगळीकडे हशा पिकला आहे. नंतर त्यांने 26 जानेवारीचा फायदा सांगितला आहे. त्याने म्हटले आहे की, 26 जानेवारीचा आणखी एक फायदा म्हणजे या दिवशी शाळेत खाऊ मिळतो असे त्याने म्हटले आहे. तसेच त्याने असेही म्हटले आहे की, या दिवशी सुट्टी मिळते म्हणून मुलांना सुट्टी मिळते, सरकारला सर्व मुलांकडून मागणी करतो की 26 जानेवारी 15 दिवस साजरा करण्यात यावा असेही त्याने म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हायरल व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडल असून संपूर्ण सोशल मीडियावर हशा पिकला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहे. अनेकांनी यावर आपल्या भन्नाट अशा प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत एका युजरने म्हटले आहे की, जेव्हा बॅकबेंचरला भाषणासाठी आग्रह केला जातो तेव्हा असे होते. तर दुसऱ्या एका युजरने भावा एक ओळ विसरला 26 जानेवारी 27 जानेवारीच्या आधी येतो असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने 26 जानेवारीला रविवार आला तर दुख होते हे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकुळ घालत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.