Viral Video: मित्रांनी हात पाय-पकडले, झुल्यासारखं झुलवलं, पाण्यात फेकलं पण...; तरुणासोबत घडलं भयंकर(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ दर सेकंदाला व्हायरल होत असतात अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आपल्याला आश्चर्यचा धक्का बसतो तर अनेकदा मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. डान्स,स्टंट, जुगाड यांशिवाय अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा तुम्ही लोक फिरायला गेल्यावर त्यांचे मज्जा-मस्ती करतानाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. सध्या असाच एक काही मित्रांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
पण या मित्रांना त्यांची मस्ती चांगलीच महागाच पडली आहे. हा व्हिडिओ एका वॉटर रिसॉर्टमधील असून पाही तरुण या ठिकाणी पाण्यात मस्ती करत आहेत. दरम्यान यातील एका तरुणाला मस्तीमध्ये उचलून पुलामध्ये फेकत आहेत. पण या तरुणासोबत असे काही भयंकर घडले आहे की, पुन्हा असा विचार देखील ते करणार नाहीत. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही तरुण पोहण्याचा आनंद घेत आहेत तर काही तरुण स्वीमिंग पुलच्या बाहेर उभे राङून डान्स करत आहेत. याचवेळी काही तकुण आपल्या एका मित्राला दोन्ही हात-पाय पकडून पूलमध्ये फेकून देतात. आधी त्याचे हात-पाय धरतात, मग झुल्यासारखं झुलवतात आमि नंतर हात-पाय सोडून देऊन स्वीमिंग पुलात फेकतात. मात्र, तरुण पाण्यात न पडता जोरात पुलाच्या कठड्यावर आदळतो. यानंतर तो पाण्यात पडतो खरं पण त्याला गंभीर दुखापत झालेली असते. कठड्यावर आदळतो त्यावेळी तरुणाला त्याच्या गुडघ्याला आणि गुप्तांगला जोराच लागते यामुळे तो वेदनेने कवळू लागतो. नंतर पाण्यातील तरुणा त्याला बाहेर काढतात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
पण या व्हिडिओतून स्पष्ट दिसून येते की, मज्जा-मस्ती करताना काळजी घेणे किती आवश्यक आहे. यामुळे एखाद्याला गंभीर दुखापत होऊ शकते किंवा जीवावर बेतू शकते. मज्जा-मस्ती करताना कोणालाही काही होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @mediarenang.id या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी अशा लोकांपासून दूर राहणे चांगले असे म्हटले आहे, तर काहींनी मजा करताना काळजी घेणे महत्त्वाचे म्हटले आहे. हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.