अरे काय चाललंय तरी काय? धावत्या ऑटोला लटकत तरुणाचा प्रवास; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले...(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर दर सेकंदाला वेगवेगळ्या प्रकारचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी तरी मारामारीचे व्हिडिओ, कधी जुगाडचे व्हिडिओ, तर कधी आश्चर्यकारक स्टंट करत असलेले व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलकीडे सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी स्टंट करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सध्या एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यामध्ये एक व्यक्ती ऑटोमागे लटकून प्रवास करत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी विविध प्रकारच्या कमेंट्स करून मजा घेतली आहे. तर अनेकांनी या धोकादायक म्हटले आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ऑटो प्रवाशांनी खचाखच भरलेली दिसत आहे. यामध्ये अनेक प्रवासी बसलेले असून जागा नसल्याने एक व्यक्ती ऑटोच्या मागे लटकून बिनधास्तपणे प्रवास करत आहे. रस्त्यावर ऑटो वेगाने धावत आहे, मात्र त्या व्यक्ती अपघाताची तमा नसून तो ऑटोमागे लटकून रआहे. त्याच्या चेहऱ्यावर अपघाताची भीती दिसत नाही, हे पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हा व्हिडिओ अद्याप कुठला आहे याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र, या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ इंस्टाग्रामवर @arariamemes__ या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. काही तासातच या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेक लोकांनी व्हिडिओवर कमेंट्स करून त्या व्यक्तीच्या धाडसावर आणि बेधडकपणावर टीका केली आहे. एक युजरने म्हटले आहे की, “जर चुकून एकदा हात घसरला, तर मुलगा देवाला प्रिय होईल.” तर दुसऱ्याने, “काही वाईट कृत्य करू नको, मित्रा.” असे म्हटले आहे. आणखी एका युजरने, “असे दिसते की यमराजांना अजून ते लक्षात आले नाही.” अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओवरून काही लोक मजा घेत आहेत, तर काही लोक त्याच्या धाडसावर चिंता व्यक्त करत आहेत. या प्रकारचा व्हिडिओ नेहमीच काही ना काही चर्चेला जागा देतो. लोकांच्या अशा कृत्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता असते, हे लक्षात घेऊन त्याच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.