दिवसभर पंखा चालावा 1 रुपयाही बिल येणार नाही, तरुणाचा हटके जुगाड होतोय Viral
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ आपल्याला पोट धरून हसवतात तर काही आपल्याला आश्चर्याचा धक्का देऊन जातात. वेगवेगळे जुगाड करण्यात भारतीयांचा हाथ कोणीही धरू शकत नाही. आता हाच जुगाड पहा ना… सध्या सोशल मीडियावर एक तरुणाचा अनोखा जुगाड चांगलाच व्हायरल होत आहे. यात तरुणाने विजेशिवाय चालणार पंखा तयार करून दाखवला आहे. या पंख्याला कोणत्याही उर्जची गरज नाही. तरुणाचा हा जुगाड पाहून आता अनेक युजर्स थक्क झाले आहेत. चला तर मग या जुगाडाविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
आम्ही तुम्हाला सांगतो की, हा पंखा तयार करण्यासाठी दोन लाकडी पट्ट्या आणि तीन नट बोल्ट घेतले, पंख्याची पाती घेतली आणि ३ रबर घेतले. आता सर्वात आधी त्या लाकडी पट्ट्यांपासून अधिकचं (+) चिन्ह तयार करा. मग आडव्या पट्टीच्या दोन्ही बाजूस आणि उभ्या पट्टीच्या वरच्या बाजूस असे तीन नट बोल्ट लावा. मग या खिळ्यांमध्ये तीन रबर लावा. आणि शेवटी मधल्या खिळ्यावर पंख्याची पाती फिक्स करा. बस्स! अन् एकदा काय हा पंखा फिरू लागला की मग दिवसभर फिरला तरी देखील थकणार नाही. आता पाहूया पंखा फिरतो कसा. त्यासाठी हा खाली दिलेला व्हिडीओ पाहा.
हेदेखील वाचा – भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन जिथे जाण्यासाठी पासपोर्ट-व्हिसाची गरज लागते, तुम्हाला माहिती आहे का?
या अनोख्या जगाचा भन्नाट व्हिडिओ @casal_gambiarra11 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये फार बारकाईने पंखा कसा तयार करायचे ते स्टेप बाय स्टेप दाखवले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून याला 3 कोटी 59 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी व्हिडिओला लाइकदेखील दिले आहेत. तर काहींनी यावर मजेशीर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, असे जुगाड फक्त युट्यूब व्हिडीओंमध्येच चालतात. अनेकांना हा पंख तयार करणे अशक्य वाटत आहे.