भारतात शेकडो रेल्वे स्थानक आहेत. भारतीयांना त्या स्थानकांवर जायचे असेल तर ते रेल्वेने देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या कोणत्याही रेल्वे स्थानकावर सहज जाऊ शकतात. स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी, त्यांच्याकडे एकतर प्रवासाचे रेल्वे तिकीट किंवा प्लॅटफॉर्म तिकीट असणे आवश्यक आहे. पण तुम्हाला माहित आहे का? की भारतात असे एक रेल्वे स्टेशन आहे जिथे जाण्यासाठी भारतीयांना फक्त प्लॅटफॉर्म तिकीटच नाही तर व्हिसा-पासपोर्टचीही गरज असते. तुम्हाला या ठिकाणाबद्दल माहिती आहे का? नाही तर मग जाणून घ्या.
अलीकडेच @hunnybunnychallenge या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक माणूस दोन मुलींना महत्त्वाचा प्रश्न विचारताना दिसत आहे. हा व्हिडिओ एका जत्रेसारख्या ठिकाणी काढलेला व्हिडिओ असल्याचे दिसून येते, जिथे त्यानं दोन मुली दिसतात. मग तो त्यांना विचारतो – भारतातील कोणते रेल्वे स्टेशन आहे जिथे जाण्यासाठी व्हिसा आणि पासपोर्ट आवश्यक आहे? हा प्रश्न ऐकून मुलींच्या मनात गोंधळ व्हायला लागतो. प्रश्न योग्य आहे यावर त्यांचा विश्वास बसत नाही.
हेदेखील वाचा – गेंड्याला पाहताच दोन्ही सिंहांची हवा झाली टाइट, दुसऱ्या वाटेने पळत सुटले अन् युजर्स म्हणाले जंगलाचा राजा… Video Viral
चला तर मग आम्ही तुम्हाला त्याचे सत्य सांगतो. @Amrit Mahotsav या अधिकृत एक्स हँडलनुसार, अमृतसरमधील अटारी रेल्वे स्थानक अटारी श्याम सिंह रेल्वे स्थानक म्हणूनही ओळखले जाते. या रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी भारतीयांना व्हिसा आणि पासपोर्टचीही गरज असते. कारण इथून गाड्या पाकिस्तानात जातात आणि अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानला जातात. हे स्टेशन भारत आणि पाकिस्तान बॉर्डरच्या अगदी बाजूला आहे. अटारी स्टेशन उत्तर रेल्वेच्या फिरोजपूर विभागांतर्गत येते.
Uniqueness is not strange to our country. But what if we told you there exists a railway station in the country where even Indian citizens need a visa to enter!? (1/2)#AmritMahotsav #DidYouKnow #MainBharatHoon #IndianFacts @incredibleindia #IncredibleIndia pic.twitter.com/5eV94wNwNy
— Amrit Mahotsav (@AmritMahotsav) December 17, 2022
येथे जाण्यासाठी पाकिस्तानी व्हिसा आवश्यक आहे. स्थानकाच्या सुरक्षेची जबाबदारी लष्करावर असून येथील प्रवाशांना अनेक पातळ्यांवर चेकिंगमधून जावे लागते. अटारी हे अमृतसर-लाहोर मार्गावरील भारतातील शेवटचे रेल्वे स्थानक आहे.
इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाल्याचे दिसून आले. या व्हिडिओला 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून काही लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. अनेकांनी योग्य उत्तर दिले आहे. तर कोणी उत्तरात लिहिले – ‘भारताचे विमानतळ!’