viral video beggar travel from vande bharat or Shatabdi Express peoples reaction goes viral
भारताची सर्वात अलिशान आणि सर्वसामान्यांना परवडणारी वंदे भारता मेट्रो अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. वेगाने प्रवास करणाऱ्या या वंदे भारत मेट्रोमध्ये अगदी विमानातील असलेल्या सोयी सुविधा मिळतात. यामुळे यामध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, वंदे भारतमध्ये एखादा भिकारी प्रवास करण्यासाठी गेला तर त्याच्यासोबत काय होईल, त्याला मेट्रोमध्ये बसून दिले जाईल का, की त्याला चूकीची वागणूक देण्यात येईल.
असाच काहीसे या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले आहे. या व्हिडिओमध्ये एक भिकारी वंदे भारत मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसत आहे.महागड्या ट्रेनमध्ये एका भिकाऱ्याला पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. काही लोकांनी पाहून स्वत:ची सीट बदलून घेतली आहे. अनेकांनी त्याला इथे कशासाठी आला असेही विचारले. तर काही लोकांनी त्याला चांगला वागणूक दिली आहे. तसेच सुरुवातीला त्याला मेट्रो कर्मचारी आणि टीसीने प्रवेश करुन दिला नाही. परंतु त्याने तिकीट आणि आधार कार्ड दाखवताच त्याला प्रवेश देण्यात आला आहे. तसेच एका व्यक्तीने त्याला बाहेर जाण्यासही सांगितले होते.
खरं तरं ‘एक्सपिरिमेंट किंग’ नावाच्या या युट्युबचॅनलने एक प्रयोग करुन बघितला आहे. या चॅनलेने एक तरुणाला भिकारी बनवून वंदे भारत मेट्रोमध्ये प्रवास करण्यासाठी पाठवले. त्यानंतर लोकांच्या रिएक्शन्स त्यांनी रेकॉर्ड केल्या. या व्हिडिओमध्ये तुम्हा पाहू शकता की, एका शिवराज नावाच्या एका व्यक्तीला भिकारी बनवण्यात आले आहे. त्याने वंदे भारत आणि शताब्दी या दोन्ही मेट्रोमध्ये प्रवास केला आहे. फाटलेले कपडे, झोळी आणि मळक्या अवस्थेत हा तरुण मेट्रोमध्ये शिरतो. शिवराजने अजमेरची वंदे भारत, जयपूरवरुन सुटणारी शताब्दी मधून प्रवास केला आहे. दोन्ही मेट्रोमध्ये चढताना त्याला रोखण्यात आले, त्याच्या तिकीटाची चौकशी करण्यात आली. अनेकजणांना आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
व्हायरल होत असलेला व्हिडिओ युटयूबचॅनल Experiment King वर टीमने शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने माणसाची ओळख त्याच्या कपड्यांवरुन नाही, त्याच्या वागणे आणि बोलण्यावरुन दिसून येते. ही मानवी विचारसरणी आहे, दुसऱ्या एका युजरने हे पाहून लक्षात आले की, भारतातील श्रीमंत लोक गरीबांबद्दल काय विचार करतात. अशा विविध प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.